17/12/2024

भाग्य लागतं 50 वर्षे मैत्री टिकवायला ; जेऊरच्या भारत हायस्कूलच्या 1974 सालच्या बॕच ने केले गेट-टू-गेदर

0
IMG-20231107-WA0010.jpg

चिखलठाण, दि. 7 (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील भारत हायस्कूलमध्ये पन्नास वर्षांपूर्वीच्या दहावीतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन जुन्या आठवणी जागवल्या.

नोकरी व्यवसाय निमित्त विविध ठिकाणी असणाऱ्या भारत हायस्कूल जेऊर येथे 1974 साली दहावी मध्ये असणाऱ्या वर्गमित्रांनी एकत्र येऊन स्नेहमेळावा घेण्याचे ठरवले या बॅचमधील कुणी अधिकारी तर कुणी वेगवेगळ्या खात्यामध्ये कर्मचारी काही जणांणी आपला व्यवसाय शेती सांभाळून आपल्या कुटुंबाची प्रगती केलेली मात्र सर्वजणच आता सेवानिवृत्तीचे आयुष्य जगत आहेत.

शेटफळ येथील विलास लबडे व केडगावं येथील मगनदास लोकरे जेऊरचे दिलीप माने यांनी पुढाकार घेऊन आपल्या या सर्व वर्गमित्रांचे मोबाईल नंबर मिळवून सर्वांना संपर्क केला सर्वांनी एकत्र येण्याची कल्पना मांडली सर्वांनाच ती आवडली तात्काळ सर्वांनी होकार दिला दिवस ठरला वेळ ठरली.

सर्वजण वेळेपूर्वीच भारत हायस्कूलच्या मैदानात हजर झाले आणि आयुष्यात वेळेचे महत्व ज्या शिक्षकाने पटवून दिले होते परंतु ते आज हयात नाहीत असे भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक प्राचार्य कै मु.ना कदम सरांची सर्वांना आठवण झाली शाळेच्या आवारात असलेल्या सरांच्या अर्धाकृती पुतळ्यास माजी विद्यार्थी मन्मथराव‌ ननवरे यांनी पुष्पहार अर्पण केला सर्वांनी अभिवादन केले.

यावेळी संस्थेचे सचिव अर्जुनराव सरक सध्याचे मुख्याध्यापक प्रा.केशव दहिभाते, पर्यवेक्षक एन.डी.कांबळे उपस्थित होते ज्या शाळेत शिक्षण घेतले त्याच शाळेची प्रगती पाहून सर्वांना आनंद वाटला दहावीला बसायला असलेल्या वर्गात सर्वजण गेल्यानंतर सर्वांना जुन्या आठवणी दाटून आल्या हास्यविनोद करत सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले सर्वांनी एकत्र स्नेहभोजन केले.

यावेळी मन्मथ ननवरे, भगवान आदलिंग, नामदेव बिचितकर, सुभाष लोंढे, दिलीप हाके, सुभाष जराड विलास कन्हेरे, भावना उदारे, शबनम खान, विजया यादव, छाया दुग्गड, हिरा खांडेकर, प्रकाश काळे, हरिचंद्र पवार, ज्ञानदेव शेंडे, सुभाष खाडे दशरथ मारकड, मगनदास लोकरे, विलास लबडे, दिलीप माने, मारुती अमृळे, रामचंद्र हिंगे, दादा कदम यांच्यासह सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते.

आमच्या दहावीच्या बॅचच्या स्नेहमेळ्याची दिवस व वेळ पंधरा दिवस अगोदर निच्छित झाला परंतु शाळेत असताना सुट्टीच्या दिवसाची जशी वाट पाहत असायचो त्याचप्रमाणे या दिवसाची ही आम्ही सर्वजण पंधरा दिवस अक्षरशः वाट पाहत होतो. त्यादिवशी आम्ही पन्नास वर्षे मागे जाऊन जुन्या आठवणी जाग्या केल्या यावेळी फारच वेगळ्या आनंदाचा अनुभव आम्ही घेतला.

विलास लबडे (माजी विद्यार्थी शेटफळ)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page