करमाळा तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती : जेऊर-चिखलठाण-कंदर चा समावेश

जेऊर, दि. 24 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील एकूण 13 ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नियुक्ती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी यांनी नियुक्तीचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे सध्या ग्रामपंचायतवर सत्ता असलेल्या कारभाऱ्यांचे तात्पुरते संपले आहे.
13 ग्रामपंचायतीच्या मुदत संपलेली असून यामध्ये जेऊर, राजुरी, चिखलठाण, गौंडरे, उंदरगाव, कंदर, कोर्टी, निंभोरे, केत्तूर, वीट, रामवाडी, घोटी, भगतवाडी या गावांचा समावेश आहे.
सदरील 13 ग्रामपंचायतच्या निवडणूका येत्या मे-जून दरम्यान होणार आहे. दरम्यान करमाळा तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायत असलेल्या जेऊर ग्रामपंचायतच्या प्रशासक पदी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मनोजकुमार म्हेत्रे यांची नियुक्ती झालेली आहे. तर भगतवाडी ग्रामपंचायतीवर विस्तार अधिकारी एम.डी म्हेत्रे, राजुरी ग्रामपंचायतीवर कृषी अधिकारी डी. आर.सारंगकर, चिखलठाण ग्रामपंचायतवर मुख्याध्यापक व्ही.व्ही.वाघमारे, गौंडरे ग्रामपंचायत वर विस्तार अधिकारी ए.डी. थोरात, उंदरगाव ग्रामपंचायतवर एम.डी म्हेत्रे, कंदर ग्रामपंचायतवर विस्तार अधिकारी(कृषी) टी. जी. साठे, कोर्टी ग्रामपंचायतवर केंद्रप्रमुख आदिनाथ देवकाते, निंभोरे ग्रामपंचायतवर विस्तार अधिकारी कृषी टी.जी साठे तर केतुर ग्रामपंचायतवर विस्ताराधिकारी एम.डी म्हेत्रे,वीट ग्रामपंचायतवर कृषी अधिकारी डी आर सारंकर,रामवाडी ग्रामपंचायत वर विस्तार अधिकारी एम.डी.म्हेत्रे, घोटी ग्रामपंचायत वर विस्तार अधिकारी(कृषी) टी.जी.साठे यांची प्रशासक नेमणूक केली आहे.

