12/01/2026

रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचे आदेश ; आमदार नारायण आबा पाटील यांच्या पाठपुराव्यास यश

0
image_editor_output_image923153494-1746466709747.jpg

करमाळा, दि. ६ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील नियोजीत रिटेवाडी उपसा सिंचन योजनेचे तातडीने सर्वेक्षण करा असे आदेश पाटबंधारे खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले असल्याने आता सर्वेक्षण करण्यातील अडथळे दुर झाले असून नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या जमिन स्तरावरील कामाचा लवकरच श्रीगणेशा होणार असल्याची माहिती आमदार नारायण आबा पाटील यांनी दिली.

आज अहिल्यानगर येथे कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतून आमदार पाटील यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. या बैठकीस विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे, आमदार रोहित पवार, आमदार विक्रम दादा पाचपुते, आमदार दिलीप वळसे-पाटील, कार्यकारी संचालक कपोले साहेब, मुख्यअभियंता कृष्णा खोरे विकास महामंडळ धुमाळ साहेब, श्री.सांगळे साहेब अधिक्षक अभियंता कृ.खोरे वि. मंडळ पुणे, जिल्हाधिकारी अहिल्यानगर, कोळवाडी शाखेचे धायगुडे साहेब, मेहेर आदी सह कुकडी प्रकल्प समाविष्ट सर्व विधानसभा मतदार संघातील आमदार, पाटबंधारे खात्याच्या पुणे विभागीय स्तरावरील प्रमुख अधिकारी तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील या विभागाचे सर्व‌ अधिकारी उपस्थित होते.

याबाबत अधिक माहिती देताना आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले की, आमदार म्हणून मी कुकडी कालवा सल्लागार समितीच्या दोन्ही बैठकीत नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेचा विषय मांडला.मागील बैठकीत सुध्दा आपण या विषयावर प्रश्न उपस्थित केला होता. आणि आज सदर प्रश्न परत एकदा मांडल्यानंतर नामदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यामुळे इतके दिवस केवळ कागदावरच अस्तित्व असलेल्या नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या कार्यस्थळावर शासनाकडून अधिकृत सर्वेक्षण होईल.

या कामाच्या पाठपुराव्यातील हा महत्वाचा निर्णय असून यावरच या योजनेच्या पुढील कामाची दिशा ठरणार आहे. नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी आपण सर्व काही पणाला लावून पाठपुरावा करत असून यापुढेही या योजनेच्या प्रत्यक्ष काम सुरु होण्यापर्यंत आपण पाठपुरावा चालू ठेवणार आहोत. करमाळा तालुक्यातील उत्तर भागातील हजारो एकर क्षेत्रात उजनीतून पाणी मिळावे यासाठी आपले प्रयत्न सुरू राहणार असल्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले. तर नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजना हा आमदार नारायण आबा पाटील यांचा ड्रिम प्रोजेक्ट असून त्यांच्या कल्पनेतुन या कामासाठी चर्चा सुरु झाली.

आमदार नारायण आबा पाटील यांच्या विधानाचा निवडणुकीतील शेतकऱ्यांना दिलेल्या वचननाम्यातील हा विषय असुन आमदार झाल्यानंतर त्यांनी मागील विधानसभा अधिवेशनात विधीमंडळ कामकाजातही सभागृहात हा विषय मांडला होता. यामुळे आगामी काळात या योजनेच्या कार्यपुर्ततेसाठी आमदार नारायण आबा पाटील यांचेकडे योग्य ते नियोजन असल्याची माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी दिली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page