करमाळा, दि. २८ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यात पानी फाउंडेशनच्या गट शेती चळवळीमध्येविषमुक्त शेती करणारे शेतकरी एकत्र येऊन लवकरच एक विषमुक्त बाजार सुरू करण्याचा नियोजन करत आहेत.
यासाठी विषमुक्त भाजीपाला ग्राहक व शेतकरी यांचा संवाद मेळावा करमाळा येथे आज शनिवारी दि. २८ रोजी सकाळी १० वाजता यशकल्याणी भवन चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे.
विषमुक्त आहार काळाची गरज यावर मार्गदर्शन करण्यासाठी डॉ प्रतिभाताई कोलते (हेल्दी फूड बँक ग्रुप प्रमुख) व डॉ अविनाश पोळ (मार्गदर्शक पानी फाउंडेशन) हे मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर शेतकरी व ग्राहक यांच्यात चर्चा करणार आहेत.