जेऊर, दि. २९ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील उद्या दि. ३० जूनचा आठवडा बाजार प्रशासनाकडून रद्द करण्यात आला असल्यामुळे बाजार बंद राहणार आहे.
नाशिक येथील त्रिंबकेश्वर येथून पंढरीला निघालेल्या श्री संत निवृत्तीनाथ महारांजाची पालखी उद्या ३० जूनला जेऊर येथे मुक्कामाला येणार असून आज रविवारी रावगावं येथे मुक्काम घेणार आहे. तर उद्या सकाळी करमाळा शहरात येणार असून उद्या संध्याकाळी जेऊर येथे मुक्कामी येणार आहे.
श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीत सुमारे ५० ते ६० हजार वारकरी यांचा समावेश आहे. सोमवारचा आठवडा बाजारामुळे होणारी गर्दी अन् दिंडीची गर्दी पाहता प्रशासनाने आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार जरी बंद राहणार असला तरी बाजारपेठेतील दुकाने नियमितपणे सुरू राहणार आहेत.