12/01/2026

माध्यमिक शिक्षक-सेवक पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न ; सदस्यांना दहा टक्के दराने लाभांश देणार- चेअरमन मनिषा तनपुरे

0
image_editor_output_image-19465703-1752415566640.jpg

करमाळा, दि. १३ (करमाळा-LIVE)-
माध्यमिक शाळा शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था दहा टक्के दराने लाभांश देणार असल्याचे मत संस्थेच्या चेअरमन मनिषा तनपुरे यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ संचालक व उपाध्यक्ष कांतीलाल बदे, संचालक सुनिल जाधव, दत्ता भागडे, किरण परदेशी, साहेबराव आरकिले, नानासाहेब नीळ, श्रीकांत नलबे, ज्योती चव्हाण, सुहास गायकवाड, माजी चेअरमन बाळासाहेब भिसे आदी उपस्थित होते.

जेऊर येथे भारत महाविद्यालयात माध्यमिक शाळा शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था मर्यादित करमाळा या संस्थेची ४४वी वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर सभेवेळी संस्थेचे ज्येष्ठ सभासद विठ्ठल रोडगे आणि छाया बरडे हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सत्कर करण्यात आला. तसेच इयत्ता दहावी आणि बारावी व शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झाले बद्दल सभासद पाल्यांचा प्रथम क्रमांक १००१रू, द्वितीय क्रमांक ७००रू, तृतीय क्रमांक ५०१रु देऊन गौरव करण्यात आला.

संस्था अहवाल वाचन सचिव पांडुरंग वाघमारे यांनी वाचून दाखविला. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. सर्व सभासदांनी पतसंस्थेच्या पारदर्शक आणि काटकसरीच्या कामाचे कौतुक केले.

ज्येष्ठ सभासद विठ्ठल रोडगे यांनी आपले विचार व्यक्त केले. सभेसाठी शिवशंकर फुलारी, बागवान सर, रमेश भोसले, गलांडे सर, मंगेश अभंग, संजय केकान, हरी शिंदे, प्रमोद गायकवाड, महेश कांबळे, बाळासाहेब शिंदे, मारुती जाधव, संदीप पुजारी, मारुती किरवे, जगदाळे सर, शेलार सर, शिंदे सर, काझी सर, लहू तनपुरे, रविंद्र सपकाळ, प्रकाश कांबळे, विजय धनवे, विकास पवार, सुरेश बरडे, कोरडे सर, बाळासाहेब सरक, नारायण मोटे हजर होते.

सूत्रसंचालन अंगद पठाडे यांनी तर आभार दत्ता भागडे यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page