रिटेवाडी उपसा सिंचन नियोजनाच्या सर्वेक्षणाबाबत जलसंपदामंत्री विखे-पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना- आमदार नारायण पाटील

विधानभवन येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे उपस्थितीत झाली बैठक
करमाळा, दि. १८ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेबाबत तात्काळ सर्वेक्षण करून पुढील कार्यवाही करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती आमदार नारायण पाटील यांनी दिली आहे.

रिटेवाडी उपसा सिंचन योजना, दहिगावं उपचा सिंचन खोली वाढवणे व माढा तालुक्यातील सीना माढा उपसा सिंचन योजनेत कुर्डू, पिंपळखुटे, अंबड गावाचा समावेश करण्यासंदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवन येथे बैठक घेण्यात आली.
या बैठकीला माढ्याचे आमदार अभिजीत पाटील, जलसंपदा विभाग सचिव दीपक कपूर, यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीला जिल्हाधिकारी कुमार
आशीर्वाद हे ऑनलाइन उपस्थित होते. याबाबत अधिक माहिती देताना आमदार नारायण पाटील यांनी सांगितले की, करमाळा तालुक्यातील रिटेवाडी उपसासिंचन योजनेला मंजुरी मिळावी याबाबत आपण पाठपुरावा करत असून याबाबत विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला आहे.
विधिमंडळात प्रश्न उपस्थित केल्यानंतर याबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना रिटेवाडी उत्सव सिंचन योजनेबाबत तात्काळ सर्वेक्षण करून पुढील कार्यवाही करण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत.
तसेच कुर्डू, पिंपळकुंटे या भागाला सीना माढा योजनेतून ओव्हर फ्लोचे पाणी देण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना जलसंपदा मंत्र्यांनी सूचना दिली आहेत.
दहीगांव उपसा सिंचन योजनेची पाणी पातळी ४९० मीटर आहे. उजनी धरणाची पाणी पातळी कमी झाल्यानंतर दहिगाव उपचा सिंचन योजनेच्या पंपाला पाणी मिळत नाही .त्यामुळे या पाणी पातळीत वाढ करण्याची मागणी केली असून याला जलसंपदा मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत आमसभेत ठराव घेण्यात आला होता. त्यानंतर आपण विधानसभेतही दहिगांव उपचा सिंचन योजनेची पाणी पातळी वाढवण्याबाबत विधानसभेत आपण प्रश्न उपस्थित केला आणि आजच्या बैठकीत जलसंपदा मंत्री यांनी ही पाणी पातळी वाढवण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिली आहेत.
आमदार नारायण पाटील, करमाळा विधानसभा




