19/10/2025

सोलापूरातील जात पडताळणी कार्यालयातुन कमीतकमी वेळात प्रकरणांचा निपटारा होणार- युवानेते दिग्विजय बागल यांच्या मागणीला यश

0
IMG-20250730-WA0053.jpg

करमाळा, दि. ३० (करमाळा-LIVE)-
शैक्षणिक कामांसह इतर महत्त्वाच्या कामांकरता जात पडताळणी सोलापूर कार्यालयाकडून कमीत कमी वेळेत व विना विलंब गतिमान व पारदर्शीपणे जात पडताळणी प्रकरणाचा निपटारा करण्यात यावा अशा स्पष्ट सूचना व आदेश राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसट यांनी भ्रमणध्वनी वरून सोलापूर जात पडताळणी कार्यालयातील अधिकाऱ्यांना केल्या असल्याची माहिती शिवसेना जिल्हा युवा नेते व मकाई कारखान्याचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांनी दिली आहे.

आज शिवसेनेचे युवानेते दिग्विजय बागल यांनी मुंबईत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसट यांची मंत्रालयात भेट घेऊन सोलापूर जात पडताळणी कार्यालयाकडून जात पडताळणी बाबत होणाऱ्या विलंबा बाबत व सदर कार्यालयाचे कामकाज पारदर्शक गतिमान करणे बाबत पत्र दिले होते.

यापूर्वी म्हणजे दोन दिवसा खाली शुक्रवारी दिग्विजय बागल यांनी त्यांच्याकडे आलेल्या जात पडताळणीसाठी अर्ज दिलेल्या अर्जदारांच्या असंख्य तक्रारी आल्या होत्या. त्याबाबत दिग्विजय बागल यांनी थेट सोलापूर जात पडताळणी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांशी समक्ष भेटून चर्चा केली जात पडताळणीच्या त्रुटींबाबत अर्जदारांना ईमेल द्वारे कळवले जाते परंतु अर्जदारांना ईमेल वरील निरोप अथवा संदेश वेळेवर मिळत नाहीत कारण अनेक अर्जदारांनी आपले अर्ज खाजगी ऑनलाइन सेंटरवरून भरलेले असतात त्यामुळे अर्जदारांच्या त्यांच्या स्वतःच्या व्हाट्सअप नंबर वर जात पडताळणी कार्यालयाने ज्या काही त्रुटी अथवा कागदपत्रांची पूर्तता करणे बाबत कळवावे त्यामुळे वेळेचा अपव्यय टळेल अनेक प्रकरणी हेतू पुरस्सर सर्व कागदपत्रांची पूर्तता असूनही एक ते दीड वर्षापासून प्रलंबित आहेत.

सोलापूर जात पडताळणी कार्यालयात सध्या समितीच्या अध्यक्षा म्हणून एक अत्यंत कार्यक्षम व तत्पर महिला अधिकारी नियुक्त केले गेले आहेत परंतु कार्यालयातील इतर संबंधित अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचे कडून सातत्याने जात पडताळणीची प्रकरणे विलंबनाने पूर्ण केली जातात कामातही पारदर्शीपणा व गतिमानता दिसत नाही विशेषतः कुणबी मराठा जात पडताळणीची अनेक प्रकरणे अनेक दिवसापासून कार्यालयात प्रलंबित आहेत यावर अर्जदारांना नेमक्या काय त्रुटी आहेत किंवा काम होणार आहे किंवा नाही याबाबत कळविले जात नाही या सर्व मुद्द्यांवर आज दिग्विजय बागल यांनी सदरची बाब मंत्री महोदय माननीय संजयजी शिरसाट साहेब यांच्या निदर्शनास प्रकर्षाने आणून दिली.

यावर तातडीने माननीय मंत्री संजय शिरसट यांनी सोलापूर येथील जात पडताळणी कार्यालयातील अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून सक्त भाषेत सूचना दिल्या व अशा प्रकारचा विलंब खपवून घेतला जाणार नाही जात पडताळणीची कामे वेळेत पूर्ण करून त्याचा तातडीने निपटारा करावा अशा स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती शेवटी दिग्विजय बागल यांनी दिली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page