सहा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर दहिगावं उपसा सिंचनाचे पाणी सालसे तलावात दाखल ; आमदार आबा पाटील यांच्या कार्यपद्धतीवर शेतकरी समाधानी

करमाळा, दि. १० (करमाळा-LIVE)-
आमदार नारायण आबा पाटील यांच्या आदेशानुसार सध्या करमाळा तालुक्याच्या पुर्व भागातील तलाव, बंधारे, नाला बिल्डींग, गावतळी, शेततळी आदि पाणीसाठे दहिगावं उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून भरले जात आहेत.
गेल्या महिनाभराहून अधिक कालावधी उलटला तरी ओव्हर फ्लो आवर्तन चालू आहे. गेल्या पाच वर्षात ज्या ठिकाणी दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी कधीच पोहचले नाही अशा ठिकाणीही आमदार नारायण आबा पाटील यांच्या कालावधीत पाणी दिले जात आहे. यात वडशिवणे तलाव, नेर्ले तलाव, वरकुटे बंधारे यासह आता सालसे तलाव यातही मुबलक पाणी दिले गेले आहे. आता पर्यंत वरकुटे, नेरले, घोटी, वडशिवणे, केम हद्दीतील चारी, निंभोरे, आळसुंदे परिसरातील बंधारे, साडे तसेच सालसे भागातील पाणी साठे भरले गेले आहेत.
आज युवानेते पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते सालसे-नेर्ले तलावातील उजनीच्या पाण्याचे पुजन करण्यात आले. यावेळी पुर्व भागातील उर्वरित गावांनाही दहिगाव उपासाचे पाणी देण्याचे नियोजन आखले आहे. या योजनेपासून वंचित चाऱ्या व तलावांचा योजनेत कायमस्वरूपी समावेश करण्यासाठी आमदार नारायण आबा पाटील आग्रही असल्याचे युवानेते पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.
यावेळी आदिनाथचे संचालक आबासाहेब अंबारे, सरपंच दादासो भांडवलकर, सरपंच सोमनाथ देवकाते, तात्या तांबे, सतीश रुपनवर, अच्युत पोळ, राजेंद्र हांडाळ, जालिंदर पाटील, राहुल देवकाते, अभिमान कारंडे, बाजीराव घाडगे, धनाजी येवले, पत्रकार संतोष राऊत, सुखदेव देवकाते, सोमनाथ हांडाळ, जालिंदर शिंदे, सुनील शेठ कदम, लोकरे सर, नागेश देवकाते, धनजी येवले, तानाजी लोकरे, अंकुश काळे, गणेश पाटील, शिवाजी गवळी, नागनाथ सरवदे, अतुल माने, विजय देवकाते, नानासाहेब ठोंबरे, शिवाजी लोकरे, धनाजी सरवदे, मालदेव पाडुळे, राजु सफकाळ, अक्षय वायकुळे, आबा काळे, दिनेश लोकरे, भाऊ पोळ, बिभीषण सालगुडे, गोरख पोळ, शुभम सफकाळ, संदीप वायकुळे, अतुल शिंदे आदी उपस्थित होते.
सालसे तलावात पाणी मिळावे म्हणून तत्कालीन आमदार संजयमामा शिंदे यांना व पाटबंधारे विभागास सालसे येथील शेतकऱ्यांनी अनेकदा निवेदने दिली. पाणी देण्यासाठी मागणी केली. वेळप्रसंगी आंदोलन केले परंतु सालसे गावास पाणी दिले गेले नाही. पाणी मागणीसाठी आंदोलन केले म्हणून सन २०१९ ते २०२४ या कालावधीत शेतकऱ्यांवर पोलीस केस सुध्दा करण्यात आल्या. यामुळे आता सत्तांतर होऊन नारायण आबा पाटील हे आमदार झाल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यांनी पाणी मागणी करताच तात्काळ सालसे तलावात पाणी दिले गेले. एवढेच नाही तर सीना कोळगाव उपसा सिंचन योजना कार्यान्वित करुन त्या द्वारे सुध्दा सालसे नेरले, गोंडरे आदि पाण्यापासून वंचित भागास पाणी देण्याचे काम आमदार नारायण आबा पाटील यांनी केले. यामुळे आता या भागातील शेतकरी आमदार नारायण आबा पाटील यांच्या कामकाजिवर समाधान व्यक्त करत आहेत.