कविटगावच्या लोककल्याण प्रतिष्ठानच्या वतीने सांगवी-२ येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

कंदर, दि. १५ (करमाळा-LIVE)-
कविटगावं येथील लोककल्याण
प्रतिष्ठानच्या वतीने सांगवी-२येथील जि.प शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये दप्तर, अंकलिपी व प्रत्येक विद्यार्थ्याला चार वह्या इत्यादी वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी लोककल्याण प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पांडव, खजिनदार रशीद तांबोळी व सदस्य अर्जून गव्हाणे उपस्थित होते. मुख्याध्यापक शंकर लोणकर, कांबळे सर यांचे सहकार्य लाभले. सदरील कार्यक्रमास कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मेजर विश्वजीत कदम, शालेय समिती अध्यक्ष प्रतिनिधी तुळशीदास शिंदे शालेय समिती उपाध्यक्ष विश्वनाथ गिराम, ग्रामपंचायत उपसरपंच दिनकर तळे, वैभव तळे, पोलीस पाटील राहुल सुतार व गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.