उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष वाढीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; एका दिवसांत नऊ शाखांचे उदघाटन- दिग्विजय बागल यांची माहिती

करमाळा, दि. २१ (करमाळा-LIVE)-
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष वाढीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून एका दिवसांत नऊ शाखांचे उदघाटन करण्यात आल्याची माहिती युवानेते दिग्विजय बागल यांनी दिली आहे.
करमाळा तालुक्यातील गाव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक करण्यासाठी युवानेते दिग्विजय बागल प्रत्येक गावात शाखा निर्माण करत आहेत. काल बुधवारी तालुक्यातील पश्चिम भागात कोंढारचिंचोली, टाकळी, खातगाव-१, खातगाव-२, खातगाव-३, रामवाडी, कावळवाडी, भिलारवाडी, जिंती या गावांमध्ये शिवसेना शाखा उद्घाटन करण्यात आले.
यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील पक्षकार्यास शुभेच्छा देत खांद्याला खांदा लावून काम करण्याचे आवाहन श्री बागल यांनी केले.
यावेळी तसेच दिग्विजय बागल यांनी बोलताना सांगितले की, यावेळी करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावात गाव तिथे शाखा स्थापण्यात येणार आहेत घर तेथे शिवसैनिक तयार करणार असून, याद्वारे लोकांच्या विविध समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे जिंती येथील मुख्य कार्यक्रमात दिग्विजय बागल यांनी सांगितले तरुणाची ओढ ही शिवसेना पक्षाकडे असून त्यातून लोकांची विविध प्रकारची कामे करणार असून, आम्ही केवळ निवडणुकांपुरते लोकांच्या दारात जात नाही तर तालुक्यातील सर्वसामान्य लोकांच्या सुख-दुःखात कायम त्यांच्यासोबत असतो.
तालुक्यातील विविध अडचणी सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्नशील असून, येणाऱ्या सर्व निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढवल्या जातील. आपले नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा पक्षवाढीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून गावागावातून शिवसेनेच्या शाखा उद्घाटनासाठी आग्रह होत आहे़.
यावेळी मकाई सह,साखर कारखाण्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर, संचालक बाळासाहेब पांढरे, आशिष गायकवाड, दत्ता गायकवाड, अजित झांजुर्णे,गणेश तळेकर, विलास काटे, मोहन गुळवे, गणेश तळेकर, नंदू भोसले, महेश तळेकर, दिनकर सरडे, रामभाऊ हाके, सतिश निळ, मुकुंद गिरमकर, शिवसेना युवासेनेचे विशाल गायकवाड व पश्चिम भागातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते .
भिलारवाडी येथे शिवसेना शाखेचे उदघाटन करताना शिवसेना नेते दिग्विजय बागल, रामभाऊ हाके, दत्ता गायकवाड व उपस्थित सर्व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी होते.