19/10/2025

आमदार आबा पाटील यांचा वाढदिवसानिमित्त माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी केला सत्कार

0
IMG-20250823-WA0046.jpg

जेऊर, दि. २३ (करमाळा-LIVE)-
करमाळा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज जेऊर येथे भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी आवर्जून उपस्थित राहून आमदार नारायण आबा पाटील यांना शुभाशीर्वाद दिले.

आमदार नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज जेऊर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यात १५८ रक्तदात्यांनी रक्तदान करुन राष्ट्रीय कार्यास हातभार लावला. तर यावेळी भव्य अशा आरोग्य शिबीराचेही यशस्वी आयोजन करण्यात आले. यात हजारो नागरिकांनी आरोग्य तपासणी केली. तसेच वाढदिवसानिमित्त गेले आठवडाभर मतदार संघात विविध सामाजिक उपक्रम राबवले गेले.

यात चिखलठाण येथे नेत्र तपासणी व मोफत शुगर तपासणी किट वाटप, गौंडरे येथील धर्मवीर संभाजी विद्यालयात आरोग्य शिबीर, आवाटी येथे रक्तदान शिबीर, कुर्डुवाडी येथे भव्य रोजगार मेळावा, भाळवणी येथे विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप, राष्ट्रवादी काँग्रेसचे वतीने तालूकाध्यक्ष संतोष वारे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना वह्या वाटप, सरफडोह येथे नियोजित नेत्र तपासणी शिबीर,
भारत हायस्कूल जेऊर येथे विद्यार्थ्यांसाठी वृक्षारोपण कामास प्रेरणा म्हणून रोपांचे वाटप आदी उपक्रम राबवले गेले.

आज दिवसभरात प्राचार्य जयप्रकाश
बिले, सुनील बापु सावंत, बी.डी.बप्पा पाटील, धुळाभाऊ कोकरे, माजी जि.प. सदस्य सावितदेवी राजेभोसले, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष संतोष वारे, आदिनाथचे संचालक नवनाथ झोळ, देवानंद बागल, राजाभाऊ कदम, महेंद्र पाटील, डॉ.हरिदास केवरे, महादेव पोरे, हनुमंत सरडे, आबासाहेब आंभारे, श्रीमान चौधरी, अॕड राहुल सावंत, किरण कवडे, रामेश्वर तळेकर, दत्तात्रय देशमुख, दादासाहेब पाटील, विजयसिंह नवले, रविकिरण फुके, माजी सभापती अतुल पाटील, शेखर गाडे, गहिनीनाथ ननवरे, माजी उपसभापती दत्ता सरडे, नागनाथ लकडे, विलास मुळे, डॉ. वसंत पुंडे, राजेंद्रसिंह राजेंभोसले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाहूराव फरतडे, नारायण शेठ अमृळे, प्रा.संजय चौधरी, अभयसिंह राजेंभोसले, कृषि उत्पन्न समितीचे संचालक बाळासाहेब पवार, जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप, संजय पाटील घाटणेकर,भास्करराव भांगे, कृषीधिकारी नेटके साहेब, रमेश कांबळे, लक्ष्मण अण्णा सरडे, विलास बरडे, विकास गलांडे, बाबासाहेब बोरकर, किरण पाटील व घारगाव ग्रा.पं सुभाष जाधव, संजय तोरमल, उदयसिंह मोरे-पाटील, बाळासो काळे, कारखान्याचे एम.डी.बागनवर व कर्मचारी वर्ग, गोवर्धन करगळ, रामभाऊ नलवडे, शहजीराव शिंदे, नितीन व्हटकर, दादासाहेब भांडवलकर, विनोद शिंदे, बप्पा अवतारे, दराडे गुरुजी, राजेंद्र भोसले, अॕड.दीपक देशमुख, शिवाजी सरडे, विठ्ठल शिंदे, शहाजी नलवडे, संतोष कानगुडे, अंकुश शिंदे, भीमराव घाडगे, मंगवडे दादा, भाऊसाहेब जगदाळे, तानाजी शिंदे, पंडित वळेकर, अशोक राऊत, हंबीरराव गोरे मेजर, अमर जगताप, तात्या गोडगे, महानवर सर, महेंद्र मेहता, महादेव नगरे, युवराज पाटील, रावसाहेब शिंदे, अरुण शेळके, काकासो नाडकर, अण्णासो रुपणवर, अमोल गायकवाड, निवास उगले, शहाजी पाटील,आबासाहेब टापरे, महेश महामुनी, विजयराज कोकरे, केकाण गुरुजी, विलास मरगळ, अजिनाथ लाळगे, सागर पोरे, नागेश पांढरे, नानासाहेब पवार सर, तात्यासाहेब तांबे, संजय गलांडे, आनंदराव पाटील, चंद्रकांत काळे, पका पारखे, अगरवाल जहागीरदार आदी मान्यवरांनी आमदार नारायण आबा पाटील यांना भेटुन शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ संजय चौधरी यांनी केले. सुत्रसंचलन ग्रामपंचायत सदस्य विनोद गरड यांनी केले तर आभार माजी सरपंच अनिलकुमार गादिया यांनी मानले.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी आमदार नारायण आबा पाटील मित्रमंडळ व ग्रामपंचायत जेऊरच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page