रायगावं येथे मराठा समाजाचा एल्गार ; हजारो मराठा बांधव मुंबईला जाणार

करमाळा, दि. २४ (करमाळा-LIVE)-
मराठा आरक्षण मागणीच्या लढ्यासाठी करमाळा तालुक्यातील रायगावं येथून पंचवीस गाड्या मुंबईला जाणार आहेत.
मराठा समाजाबरोबरच इतर समाजाचाही आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी चलो मुंबई या दिलेल्या हाकेसाठी रावगाव येथे मराठा समाजाच्या वतीने चावडी बैठकीचे आयोजन शनिवारी संध्याकाळी आठ वाजता राम मंदिर येथे करण्यात आले होते. यावेळी गावातील मराठा तरुण उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन गावातील नाभिक समाजाचे शहाजी तात्या शिंदे यांनी केले.
त्यानंतर गावातील तरुणांनी व ज्येष्ठांनी मराठा समाजाला आरक्षणाची गरज असेल मनोज जरांगे-पाटील यांनी उभा केलेल्या लढ्यासाठी मुंबई येथे बहुसंख्येने जायचे आहे आता नाही तर कधीच नाही हा लढा अत्यंत महत्त्वाचा आहे.
त्यामुळे शक्य होतील इतक्या जास्त समाजातील लोकांनी या लढ्यामुळे सामील होणे गरजेचे आहे हे सांगण्यात आले यावेळी उत्स्फूर्तपणे वीस ते पंचवीस गाड्या मुंबईला निघतील अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आलेला असून त्याची नाव नोंदणी झाली आहे त्याचप्रमाणे वर्गणी देखील जमा करण्यात आली लोकांनी स्वतःच्या इच्छेने वर्गणी दिलेली असून २७ तारखेला दहा वाजता राम मंदिराजवळ गाड्या निघणार आहेत अशा प्रकारची माहिती दिली आहे.