जेऊर येथील कुलकर्णी कुटुंबीयांचा पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शन देणारा देखावा’

जेऊर, दि. १ (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथील प्रेमनाथ कुलकर्णी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जर वर्षी प्रमाणे यावर्षीही गौरी-गणपती समोर देखावा सादर केला आहे.
कुलकर्णी कुटुंबाने यावर्षी श्री पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन सोहळा हा देखावा सादर केला आहे.या सजावटी मुळे जेऊर परिसरात त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. जर वर्षी प्रमाणे यावर्षीही श्री कुलकर्णी यांनी आकर्षक देखावा सादर केला आहे. श्री क्षेत्र पंढरपूर येथील वाळवंट, चंद्रभागा व पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या दिशेने जाणारे भाविक तसेच पंढरपूर येथे पारंपरिक व्यवसाय करणारे व्यवसायिक हा देखावा साकारला आहे.
यासाठी शितल कुलकर्णी, मनिषा उघडे, कु समृद्धी उघडे आणि निधी कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले आहे.
गेल्यावर्षी कुलकर्णी कुटुंबीयांनी पर्यावरण संरक्षण आणि नारी शक्तीचा देखावा सादर केला होता. यातून झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा पाणी जिरवा, नारी शक्ती चा संदेश देण्यात आला होता.
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी देखावा-