करमाळ्यात नंदन प्रतिष्ठान आयोजित होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विजेत्या महिलांना शेगडी, मिक्सर,पैठणीसह मिळाल्या विविध गृहपयोगी वस्तू व रोख बक्षिसे
करमाळा, दि. ४ (करमाळा-LIVE)-
नंदन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी चे सरचिटणीस जितेश कटारिया यांच्या संकल्पनेतून प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील महिलांसाठी गणेशोत्सवाचे औचित्य साधून संदीप पाटील प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
प्रतिष्ठानच्या वतीने पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला असंख्य महिलांनी सहभागी होत सुरेल कार्यक्रमाचा आनंद लुटला. प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपुष्पादन पण करून आणि दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करून प्रतिष्ठानच्या वतीने महिलांसाठी घेतलेला कार्यक्रम कौतुकास्पद असून महिलांसाठी रोजच्या जीवनातील व्यस्त कार्यक्रमातून त्यांचा एक दिवस अनोखा करून रंजक असा खेळ व मनोरंजक केल्याबद्दल आहे, तसेच नंदन प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक उपक्रम यशस्वीरीत्या राबविले आहेत.
त्या नंतर विजेत्या महिलांना शेगडी, मिक्सर,पैठणी सह साड्या तसेच रो बक्षिसे देण्यात आली.
सर्व सामील महिलांनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेश कटारिया यांचे अनोखा कार्यक्रम राबविल्याबद्दल आभार व्यक्त केले व भावी सामाजिक – राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.