भारत प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील व भेटकार्ड

जेऊर, दि. १८ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील भारत प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिवाळी निमित्तानं आकाश कंदील व भेटकार्ड बनविले आहेत.
विद्यार्थ्यांना घराचा अभ्यास पूर्ण करणे, स्वाध्याय पूर्ण करणे, पाढे पाठांतर थोडक्यात दररोजचा अभ्यास आणि शाळा या व्यतिरिक्त त्यांना कला क्रीडा व संगीत या क्षेत्राकडे वळवले तर थोडेसे विद्यार्थी आनंदी होतात. त्यामुळे भारत प्रायमरी स्कूल मध्ये शेवटच्या दिवशी आकाश कंदील बनवणे भेट वस्तू बनवणे अशा प्रकारचा उपक्रम घेण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी अतिशय छान पद्धतीचे आकाशकंदील व भेटकार्डे तसेच विविध प्रकारचे चित्रे काढणे, अशा यावेळी विद्यार्थी खरोखरच खूप आनंदी दिसत होते. यासाठी शिक्षकांनी व पालकांनी विद्यार्थ्यांना अगोदर थोडेसे प्रशिक्षण दिले होते विद्यार्थ्यांनी आकाश कंदील अतिशय सुंदर पद्धतीचे बनवले .आकाश कंदील हुबेहूब बाजारात असतात त्या पद्धतीचे बनवले होते. साधारणता दिवाळीमध्ये आकाश कंदील प्रत्येकाच्या घरी दाराच्या समोर लागला जातो परंतु स्वतः तयार करणे आणि लावणे याच्यामध्ये खूपच फरक आहे त्याचा अनोखा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.
यासाठी शिक्षकांनी व पालकांनी अगोदरच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिल्यामुळे अगदी पहिलीपासून चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आकाश कंदील आणि भेटकार्ड तसेच विविध प्रकारची चित्रे ही अतिशय सुंदर प्रकारे काढले होती.