भारतीय जनता पक्षाने संधी दिल्यास करमाळा नगरपरिषद नगराध्यक्ष निवडणूक लढवणार – संजय घोरपडे

करमाळा, दि. २३ (करमाळा-LIVE)-
आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणूकीचे पडघम वाजायला सुरवात झाली असून नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षणाने आत्तापासूनच मोर्चे बांधणीसही सुरवात झाली आहे याच अनुषंगाने करमाळा नगरपरिषद नगराध्यक्ष हे पद सर्व साधारण महिला साठी आरक्षित असून भारतीय जनता पक्षाने संधी दिल्यास पत्नी सपना संजय घोरपडे यांच्या माध्यमातून पूर्ण ताकतीने निवडणूक लढवणार असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय घोरपडे यांनी स्पष्ट केले.
सौ.घोरपडे यांनी आजपर्यंत महिला बचत गटाच्या माध्यमातून तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून दिला आहे.
सामाजिक बांधिलकी जपत अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवून गोरगरीब, दिन-दलित, अल्पसंख्याक समाजातील रंजल्या गांजल्याना अनेक वेळा मदत केली आहे.
शहराचा विकास करावयाचा असल्यास भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विविध विकास कामे करता येतील. सध्या राज्यात व केंद्रामध्ये भाजपा महायुतीचे सरकार असल्यामुळे निधी बाबत कोणतीही कमतरता भासणार नाही. शहरामध्ये भाजपा व विचारधारेला मानणारा मोठा वर्ग आहे.
ज्याप्रमाणे राज्यात व केंद्रात भाजपच्या माध्यमातून विकास होत आहे त्याच पद्धतीने शहरांमध्ये विकास करावयाचा असल्यास भाजपाला संधी द्यावी भाजपाच्या माध्यमातूनच शहरात विकास कामे होतील अशीही चर्चा शहरवासीय तसेच मतदारा मधून होत आहे.
याबाबत आम्हीही भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांना आमची भूमिका सांगितलेली असून त्यांनीही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे.
शहरांमध्ये विरोधाला विरोध म्हणून राजकारण करण्यापेक्षा विकासाचे राजकारण होणे महत्त्वाचे आहे तरच शहराचा संपूर्ण विकास होणार आहे.
शहरातील नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा असेल किंवा हद्दवाढ मधील प्रलंबित विकास कामे असतील त्याचबरोबर शहराचे सुशोभीकरण अशा सर्वच बाबतीत भाजपा एक पाऊल पुढे असेल असे मत त्यांनी व्यक्त केले.
पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल, जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे आणि कन्हैयालाल देवी यांच्या मार्गदर्शनाखाली येणारी नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी आणि सर्व २० जागेवर नगरसेवक पदासाठी आपले उमेदवार ताकतीने उभे करून निर्णायक आघाडी घेऊ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
