कष्टातून प्रगती साधणारे पत्रकार दिनेश मडके- अॕड अजित विघ्ने

करमाळा, दि. २३ (अॕड अजित विघ्ने)-
अतिशय कष्टातुन प्रगती साधणाऱ्या आमच्या या पत्रकार मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खूप आनंद होतो की, या मित्राने त्याचे साप्ताहिक पवनपुत्रची केलेली भरभराट आणि वाटचाल वाखाण्यासारखी आहे. मी २००५ ला लॉ कॉलेजातून करमाळ्यात आलो तेंव्हा हे साप्ताहिक पवनपुत्र नुकतेच प्रगतीपथावर होते.
त्यावेळी दिनेशराव करमाळ्यात घरोघरी आणि पेठेत या साप्ताहिकाची विक्री व वाटप करायचे. या साप्ताहिकाचे मुद्रण बहुदा अहिल्यानगर म्हणजे पुर्वीचे नगर येथुन व्हावचे. त्या काळात माननीय हिरडे यांचे साप्ताहिक संदेश चांगल्याच फार्मात होते आणि आजही आहे. पत्रकार महेश चिवटे यांनी देखिल त्यावेळी बनशंकरी समाचार नावाचे साप्ताहिक काढलेले होते.त्या काळात खरं तर अनेक साप्ताहीक आले नी गेले. परंतु दिनेशराव मडके यांचे पवनपुत्र आजही कार्यरत आहे. या साप्ताहिकाचे ” पवनपुत्र” हे नाव मला खुपच आवडायचे. मी आणि माझे मित्र नरेद्रसिंह ठाकुर असेच बोलता बोलता साप्ताहिक पवनपुत्र आम्हाला द्यावे म्हणुन दिनेशराव कडे मागणी करीत होतो. परंतु दिनेशराव कमालीचे चिवट व्यक्तिमत्व.
त्यांनी साप्ताहिक आम्हाला दिले नाही मात्र या साप्ताहिकासाठी त्यांनी अविरत्र कष्ट घेतले..संपुर्ण करमाळा तालुक्यातील विविध पक्ष पार्टी च्या नेतेमंडळींना भेटुन जाहिराती मिळवणे, बातमीदारांकडून बातम्या मिळविणे आणि त्याची छपाई करून अंक वितरित करणे असे सर्व काम त्यांनी स्वतःच्या एकट्याच्या खांदयावर पेलले. शांत, संयमी राहुन आहे त्या परिस्थितीत आणि वास्तवाशी फारकत न करता त्यांनी आपले पवनपुत्र साप्ताहिकाचे रुपांतर आता डिजिटल केले आहे. जीवनात त्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागला आहे.कोरोनाकाळात वडीलांचे अचानक निधन त्यानंतर थोरली बहिण शोभाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले .त्यात त्यांच्या पत्नी सुवर्णाला कोरोना झाला होता.
या सर्व संकटावर परिस्थितीपुढे हार न मानता यशस्वीपणे मात केली आहे. यातच त्यांच्या आईला मुलीच्या निधनामुळे पॅरालिस झाला त्यांना कर्नाटकला उपचाराला नेऊन त्यांच्या स्वतच्या पायावर उभे राहुन चालण्यासाठी उपचार केले यामध्ये यश आले पण नंतर दोन तीन महिन्यांनी खुब्याचे बाॅल गेल्यामुळे त्यांना उठता बसता येत नाही.
आईला उठता बसता येत नसल्याने जागेवर अंथरुणाला खिळुन असल्याने गेल्या पाच सहा वर्षापासुन मनोभावे आईची सेवा दिनेशराव त्यांच्या पत्नी सुवर्णा वहिनी त्यांचा बंधु गणेश मनापासुन करीत आहेत. या आम्हाला अभिमान वाटतो .कधीही त्यांनी आपले दुःख जगासमोर न मांडता सदैव हसतमुख असणारे आलेल्या संकटावर यशस्वीपणे मात करून सकारात्मक जीवन जगणारे दिनेशराव यांचे जीवन आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे.गेल्या अनेक वर्षापासुन त्यां साप्ताहिका बरोबरच पोर्टल आणि कॅलेंडर, दिवाळी अंकही ते आज प्रसिद्ध करतात.
त्यांच्या बातम्या, लेख आणि छपाई खुपच छान असते. कोणतीही गोष्ट करा. त्यामधे सातत्य, जिद्द आणि चिकाटी असली की ती सक्सेस होते. आपल्या जिद्द आणि परिश्रमाने आमचे मित्र दिनेशराव पवनपुत्र नावाप्रमाणेच यशस्वी भरारी घेत आहेत. ज्येष्ठ पत्रकार व संपादक राजा माने यांच्या राज्यव्यापी डिजिटल मिडीया संघटनेचे देखिल राज्य कार्यकारणी सदस्य कार्यवाहक असुन करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत असून या माध्यमातुन पत्रकार बांधवाना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
पवनपुत्र ची घोडदौड डोळ्यासमोरची आहे. अनेक साप्ताहिक आले आणि आज दिसतही नाहीत मात्र मित्र दिनेशराव यांचे पत्रकारिता विभागातले काम निश्चितच गौरवास्पद आहे. दिनेशराव मडके यांना उत्तम आरोग्य, धन-संपदा, यश, किर्ती, आनंद मिळत राहो हीच आई कमलाभवानी चरणी प्रार्थना!!
ॲड अजित विघ्ने, केत्तुर
