पोफळजची काव्यांजली पवार निबंध स्पर्धेत तालुक्यात प्रथम

करमाळा, दि. ८ (करमाळा-LIVE)-
करमाळा पंचायत समितीच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय टॅलेंट हंट स्पर्धेत पोफळज जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी काव्यांजली प्रदीप पवार हिने लहान गटातील निबंध लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळविले आहे.
सलग तीन वर्षांपासून सातत्याने प्रथम क्रमांक मिळवत काव्यांजलीने आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे. यंदाही अव्वल स्थान कायम राखत तिने आपली गुणवत्ता सिद्ध केली.
या उल्लेखनीय यशाबद्दल पोफळज ग्रामपंचायतचे सरपंच कल्याण पवार, यशकल्याणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील, पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी नितीन कदम, जयवंत नलवडे, माजी सरपंच दत्तात्रय गव्हाणे, उपसरपंच राणी गव्हाणे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप पवार, उपाध्यक्ष रणजीत सुरवसे, मारुती पवार, दत्तात्रय पवार, मिनीनाथ टकले, चिखलठाण केंद्र प्रमुख वंदना पांडव, समन्वयक रेवणनाथ आदलिंग, तसेच मुख्याध्यापक विलास दुरंदे यांनी काव्यांजलीचे अभिनंदन केले आहे.
शिक्षिका मुमताज पठाण, जहांगीर सय्यद, रेखा शिंदे-साळुंके, शुभांगी शिंदे-बोराटे, वैष्णवी आव्हाड आणि आई पूजा पवार यांचे तिला मार्गदर्शन लाभले. या यशामुळे सर्वच स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतं आहे.





