२६/११ भव्य रक्तदान शिबीर : मदनदास देवी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी घेतला पुढाकार

करमाळा, दि. ८ (करमाळा-LIVE)-
२६/११ ला झालेल्या आतंकवादी हल्याच्या निषेधार्थ व बलिदान दिलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी व सर्वसामान्य नागरीक यांच्या सन्मानार्थ करमाळा पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या कल्पनेतून व करमाळा तालुक्यातील सर्व पोलीस आऊट पोस्ट यांच्या नियोजनातुन भव्य व रेकॉर्ड ब्रेक रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून यात सहभागी होण्यासाठी करमाळा तालुक्यातील तरुणाई सरसावली आहे.
सदरील रक्तदान शिबीरात सहभागी होण्यासाठी करमाळ्यातील मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतलेला असून संस्थेतील विद्यार्थी पृथ्वीराज चिंतामणी जगताप, मयुर शिंदे, अदित्य शिंदे, अमर राऊत, यश कांबळे, अथर्वराज शेलार यांनी पोलीस निरीक्षक रणजित माने यांची भेट घेऊन संस्थेतील किमान शंभर विद्यार्थ्यी, प्राचार्य, शिक्षक व कर्मचारी यांना रक्तदान शिबीरात सहभागी होणार असल्याचे निवेदन देण्यात आले आहे.
