03/12/2025

हिवाळी अधिवेशनात करमाळा मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न तारांकीत स्वरूपात मांडणार- आमदार नारायण आबा पाटील

0
1001534295.jpg

करमाळा, दि. १८ (करमाळा-LIVE)-
पुढील महिन्यात असणाऱ्या हिवाळी अधिवेशनात करमाळा मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न तारांकीत स्वरुपात पटलावर मांडणार असल्याची माहिती विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन दिनांक ८ डिसेंबर पासुन नागपूर येथे सुरु होत आहे. त्या अनुषंगाने आमदार पाटील यांनी मतदार संघातील काही महत्वाचे प्रश्न विधीमंडळ कामकाजात यावेत अशी मागणी केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती देताना आमदार नारायण आबा पाटील यांनी सांगितले की रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचा प्रश्न आपण सभागृहात परत एकदा मांडणार आहोत. तसेच कुर्डुवाडी व करमाळा शहरातील हद्दवाढ नागरी भागातील घरकुल तसेच पाणी, रस्ते, वीज, अंतर्गत रस्ते या मुलभूत सुविधा मिळाव्यात. उजनी प्रदुषणाचा प्रश्न अतिशय गंभीर असुन त्याबाबतही आवाज उठवणार आहोत. याशिवाय जेऊर पोलीस ठाणे नवीन इमारत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेअंतर्गत कुर्डूवाडी बाजार समितीत शेतकरी भवन, करमाळा तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर मंजुरीबाबत भुगर्भ जलपातळी अटींच्या नियमातील बदल, करमाळा तालुक्यातील कोर्टी महसूल मंडलातील शेतकऱ्यांना २०२३-२४ मधील शासन निर्णय होऊनही निधी मिळाला नसल्याबाबत प्रश्न मांडुन तातडीने निधी वितरणाची मागणी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी निर्यात बंदी निर्यात शुल्क प्रश्न, करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदांची भरती तातडीने होणे बाबत, जेऊर ता करमाळा येथे महावितरणच्या नवीन विभागीय कार्यालयच्या प्रस्तावास अंतरिम मंजुरी मिळावी व कामकाज सुरू होणे बाबत मागणी, अतिवृष्टी मुळे करमाळा तालुक्यातील बाधीत झालेल्या सिमेंट बंधारे व पाझर तलावांची दुरुस्ती, अतिवृष्टी मुळे करमाळा तालुक्यातील नादुरुस्त झालेले रस्ते, पोमलवाडी ते चांडगाव या उजनी जलाशयातील पुलाच्या मंजुरी व काम सुरू होणे बाबत, सरफडोह ता करमाळा येथील शेतजमीनीची वर्ग ३ मध्ये नोंद झाल्याने निर्माण झालेल्या मालकी हक्क व शासकीय योजनांच्या लाभाचा प्रश्न, कुकडी प्रकल्पातील संपादित १००५ हेक्टर क्षेत्राचा शेतकऱ्यांना भुसंपादन मोबदला, सीना कोळगाव उपसा सिंचन योजनेच्या द्वितीय सुप्रमास मंजुरी मिळावी, नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, अतिवृष्टी मुळे करमाळा मतदार संघातील तरटगाव कव्हे म्हैसगाव‌शिराळ येथील कोपा बंधारा दुरुस्ती, करमाळा न्यायालय वाढीव नवीन इमारत व संरक्षक भींत आणि विधीज्ञ तसेच कर्मचारी व‌पक्षकारांच्या जागे अभावी होत असलेल्या गैरसोयी बाबत, सीना नदीकाठी शेतकऱ्यांना पोल, तारा व रोहित्र अतिवृष्टीमुळे व पुरामुळे वाहुन गेल्याने वीजपुरवठा सर्व बाबींसह पुर्ववत करण्याबाबत, शेलगाव वांगी ता करमाळा येथे केळी व उस संशोधन केंद्र निर्माण बाबत, सीना कोळगाव प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या हिसरे हिवरे कोळगाव गौंडरे आवाटी येथील
शेतकऱ्यांच्या जमीन ७/१२ उताऱ्यावर इतर हक्क नोंदणी असा शेरा आल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर‌ होत असलेल्या अन्यायाबाबत, करमाळा शासकीय विश्रामगृहात चार व्हिआयपी व चार सर्वसाधारण कक्ष निर्माण होणे बाबत मागणी असे अनेक प्रश्न आपण सभागृहात मांडणार असल्याची माहिती आमदार नारायण आबा पाटील यांनी दिली.

तर येणाऱ्या अधिवेशनात या प्रश्नाशिवाय नगरविकास, कृषी, महसुल, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, गृह, पणण, पाणीपुरवठा, सार्वजनिक आरोग्य, महावितरण, शिक्षण, क्रिडा आदि विभागातील महत्वाचे प्रश्न आमदार नारायण आबा पाटील हे मांडणार असुन सदर प्रश्न विधीमंडळ कामकाजात समाविष्ट केले जावेत यासाठी ते प्रयत्नशील असल्याची माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी दिली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page