17/12/2024

वंजारवाडी ग्रामपंचायतवर पाटील गटाचीच सत्ता; वंजारवाडी ग्रामपंचायत बिनविरोध

0
IMG-20221207-WA0047.jpg

करमाळा, दि. 7 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील वंजारवाडी ग्रामपंचायतवर पाटील गटाची सत्ता स्थापन झाली आहे.

करमाळा तालुक्यातील तीस ग्रामपंचायतीच्या निवडणुका सध्या सुरू असून उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी वंजारवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने तसेच यापूर्वीच अंजनडोह ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पाटील गटाच्या उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने आता एकूण तीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकां पैकी मतदाना अगोदरच दोन ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन करुन पाटील गटाने माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यातील आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

आज बिनविरोध ग्रामपंचायतीच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार युवानेते पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते जेऊर येथे करण्यात आला. यावेळी सभापती अतुल पाटील, युवानेते पृथ्वीराज पाटील, मुंबई महापौर केसरी विजय गुटाळ, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा.अर्जूनराव सरक, ग्रामपंचायत सदस्य विनोद गरड, सदस्य संतोष वाघमोडे, संगीताचार्य योगेश खंडागळे, स्वीय सहाय्यक सूर्यकांत पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी नूतन सरपंच प्रतिक्षा प्रविण बिनवडे, सदस्य विनोद केकान, अक्काबाई विलास वाघमोडे, हरीभाऊ खाडे, रुपाली भाऊसौ बिनवडे, आबासाहेब राख, सुदामती केकान, आशा राख या नूतन पदाधिकाऱ्यांचे तथा महिला सदस्य प्रतिनिधींचे सत्कार करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी सहकार्य करणार्‍या आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचेही सत्कार करण्यात आले. यावेळी बापू केकान, भरत राख, अनिल बिनवडे, आप्पा वाघमोडे, अजिनाथ कुराडे, सुखदेव केकान, संतोष वाघमोडे, पांडूरंग राख, संतोष राख, संभाजी नेवसे, बाळू गणगे, विठ्ठल खांडेकर, मोहन सुकळे, बाळासाहेब राख, भाऊ वाघमोडे, बाळू राख, विश्वनाथ वाघमोडे, सुनील वाघमोडे, अमोल बिनवडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page