नारायण आबा टेंशन घेऊ नका, सगळं ठीक होईल.! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला माजी आमदार नारायण आबा पाटील यांचा उल्लेख
जेऊर, दि. 25 (करमाळा-LIVE)–
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार नारायण पाटील, आमदार राम शिंदे, संचालिका रश्मी बागल, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे, वैद्यकीय कक्षाचे मंगेश चिवटे यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी जनतेला संबोधन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करमाळा तालुक्याचा लक्षणीय उल्लेख केला, प्रामाणिकपणे काम करा कुठेही तुम्हाला अडचण येणार नाही, नारायण आबा टेंशन घेऊ नका सगळे ठीक होईल असा आवर्जून उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा व्हिडीओ पहा-