वाशिंबे: अॕड. निलेश वाघमोडे यांनी साडेतीन एकरात घेतले 22 लाखाचे केळीचे उत्पन्न
करमाळा, दि. 31 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथील अॕड. निलेश वाघमोडे यांनी साडेतीन एकरात घेतले 22 लाखाचे उत्पन्न घेतले आहे.
ॲड. निलेश वाघमोडे यांनी त्यांचे वकिलीचे शिक्षण पुण्यात पूर्ण केलेले असून शिक्षण घेत असताना देखील त्यांनी शेतीचा व्यवसाय सुरू ठेवला. त्यांनी त्यांच्या शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळेल याचा अभ्यास केला. त्यांनी त्यांच्या शेतीतून दरवर्षी जास्त प्रमाणात उत्पन्न काढण्यास सुरुवात केली. तदनंतर ॲड. निलेश वाघमोडे यांनी पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयात, सोमवार ते शुक्रवार वकील व्यवसाय बघून प्रत्येक शनिवारी व रविवारी करमाळा येथील त्यांचे वाशिंबे गावात येऊन शेतीकडे लक्ष देऊन उत्तम प्रकारचे केळी उत्पादन करून त्यांची निर्यात इराण व दुबई या ठिकाणी पाठविले.
ॲड.वाघमोडे हे त्यांचे केळी वरील अभ्यास वाढवत गेले व त्यांनी उच्च दर्जाचे केली उत्पादन केले. तसेच मार्च 2020 मध्ये संपूर्ण देशात कोरोना मुळे लॉकडाऊन करण्यात त्यावेळी त्यांनी केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले. अॕड निलेश वाघमोडे यांनी अगोदर केळी या पिकाचा पूर्ण पणे अभ्यास केला आहे व तसेच ते निर्यातक्षम केळी साठी काय केले पाहिजे खते, औषधे, फवारणी कोणती घेतली पाहिजे याचा अभ्यास केला तसेच तज्ञ लोकांचे मार्गदर्शन घेतले त्यानुसार पूर्ण अभ्यास केला शेती मध्ये काय कमी आहे काय जास्त आहे याची अगोदर खात्री केली व घड संगोपन कसे केले पाहिजे याचा अभ्यास केला. साधारण शेतात कमीत कमी 30-ते जास्तीत जास्त 50 किलो वजनापर्यंत घडाचे वजन निघाले आहे व यापुढे देखील ते जास्त प्रमाणात केली उत्पादन करणार आहेत.
जैन कंपनी रोप प्रतिनिधी किरण पाटील अणि डॉ के. बी पाटील यांनी मार्गदर्शन केले.