करमाळ्यात उद्या इंग्रजी भाषा शिक्षक कार्यशाळा; विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र तर इंग्रजी आदर्श शिक्षकांचा होणार सन्मान
करमाळा, दि. 30 (करमाळा-LIVE)-
करमाळा पंचायत समितीचे शिक्षण विभाग, करमाळा इंग्लिश टिचर्स असोशिएशन व यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने करमाळा तालुक्यातील इंग्रजी विषय शिक्षकांसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळे दरम्यान पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, बालभारती पुणे येथील डॉ. श्रुती चौधरी व डायट वेळापूरचे विषय समन्वयक प्रा. सुलतानचांद शेख, हे मार्गदर्शन करणार आहेत. यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे प्रा.गणेश करे-पाटील यांचे शिक्षक व निवडक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्यान होणार असल्याचे प्रसिद्धी प्रमुख सुखदेव गिलबिले यांनी सांगितले.
मंगळवार दिनांक 31 जानेवारी रोजी यशकल्याणी सेवाभवन येथे सकाळी 9.30 ते 4.00 वेळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी अॕड. बाबुराव हिरडे करमाळा गटविकास अधिकारी मनोज राऊत, गट शिक्षणाधिकारी राजकुमार पाटील हे उपस्थित असणार आहेत. सर्व इंग्रजी शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन करमाळा इंग्लिश लँग्वेज टिचर्स असोसिएशनचे तालुका अध्यक्ष कल्याणराव साळुंके यांनी केले आहे.