जेऊर एमएसईब (MSEB) च्या कर्मचाऱ्यांची सामाजिक बांधिलकी; कंदर येथील निधन झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना बीड जिल्ह्यात जाऊन केली मदत
जेऊर, दि. 12 (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील एमएसईब (MSEB) कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपली असून कंदर येथे कामास असणाऱ्या कर्मचाऱ्याचा मागील आठवड्यात मृत्यू झाला होता, दरम्यान बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा येथे जाऊन कुटुंबाला भेट देऊन मदत केली.
मयत कर्मचारी गोविंद खोडवे यांच्या कुटुंबाची पाहणी केली असता अतिशय हालाखीची व अतिशय गरीब परिस्थिती आहे. सदर ठिकाणी उत्पन्नाचे काही साधन नाही, जमीन मोजकीच ती पण जिरायत, राहायला व्यवस्थित घर नाही, आई वडिल दररोज दुसऱ्यांच्या शेतात मजूरी करून उदनिर्वाह करतात. अशी हालाखिची परिस्थिती असल्यामुळे मयत गोविंद हा कंदर (ता. करमाळा) येथे नोकरीसाठी आला होता. सदर ठिकाणी मयत गोविंद हा अतिशय प्रामाणिकपणे काम करत होता. लोकांच्या एका फोन वरती त्यांच्या कामासाठी धावत पळत जाणारा हा गोविंदाचा नियतीने घात केला आणि गोविंदाचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला.
आज गोविंदाच्या कुटुबियांना भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांना महावितरण कर्माचारी व अधिकारी यांच्या वतीने पंच्चावन्न हजार रूपयांची आर्थिक मदत केली. यावेळी उपस्थित महावितरणचे कर्तव्यदक्ष अधिकारी अशोक काळे साहेब, महावितरण ठेकेदार नितीन पाटील तसेच वरिष्ठ वायरमेन उमेश फंड व रमेश पोळ आणि तेथील ग्रामस्थ उपस्थित होते.