जेऊरच्या भारत महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. पंडित बन्ने यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार जाहीर
जेऊर, दि. 12 (करमाळा-LIVE)-
जेऊरच्या भारत महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ.पंडित बन्ने यांना महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचा सन २०२१- २०२२ चा बाबूराव विष्णू पराडकर रजत पुरस्कार (पत्रकारिता कला) घोषित झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनंत शिंगाडे यांनी दिली.
पंचवीस हजार रुपये रोख व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हिंदी साहित्य क्षेत्रात मोलाचे कार्य व भरीव योगदान देणाऱ्या साहित्यिकांना तसेच प्रतिवर्षी उत्कृष्ट वाङमय निर्मितीकरीता लेखकांना उत्तेजन देण्यासाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. डॉ. बन्ने यांना यापूर्वीही केन्द्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाचा एक लाख रुपयांचा व राज्य शासनाचा पंचवीस हजार रुपयांचा असे दोन पुरस्कार प्राप्त झाले होते.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नारायण आबा पाटील, उपाध्यक्ष अनिलकुमार गादिया, सचिव प्रा.अर्जूनराव सरक सर्व संस्था सदस्य तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व प्रशासकिय कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.