करमाळा तालुक्यात गारपीट! नागरिक खूश तर शेतकरी हवालदिल
करमाळा, दि. 18 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्याला आज संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली.
गारपीट मुळे तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात खूश झाली, अनेकांनी याचा आनंद घेतला परंतु मोठ्या गारपीट मुळे केळी, ऊस, गहू, आंबे यासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे.