श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी 21 जूनला करमाळा तालुक्यात येणार; तालुक्यात तीन मुक्काम घेणार पालखी
जेऊर, दि. 10 (करमाळा-LIVE)-
नाशिक येथील त्रिंबकेश्वर येथून पंढरीला निघालेल्या श्री संत निवृत्तीनाथ महारांजाची पालखी बुधवारी 21 जूनला करमाळा तालुक्यात येणार असून तालुक्यातील पहिला मुक्काम रावगावं येथे होणार आहे.
यावर्षी आषाढी एकादशी गुरूवार 29 जूनला असून, श्री निवृत्तीनाथ महारांजाची पालखी शुक्रवारी 2 जूनला प्रस्थान झालेली आहे.
करमाळा तालुक्यातील श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी वेळापत्रक-
21 जून- रावगावं येथे मुक्काम
22 जून- दुपारी करमाळा शहरात
22 जून- जेऊर येथे मुक्काम
23 जून- शेलगावं येथे दुपारी
23 जून- कंदर येथे मुक्काम
24- जूनला पंढरपूर कडे रवाना
प्रशासनातर्फे यासाठी तयारी करण्यात आलेली आहे. सुमारे पन्नास हजार वारकऱ्यांचा समावेश आहे.