अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेऊन लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकास जामीन मंजूर
सदर प्रकरणी आरोपीतर्फे अॕड निखिल पाटील, अॕड दत्तप्रसाद मंजरतकर यांनी काम पाहिले
करमाळा, दि. 10 (करमाळा-LIVE)-
अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून फुस लावून पळवून नेऊन लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकास जामीन मंजूर झाला आहे.
याबाबत हकीकत अशी की, एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून आरोपी अभिजीत हनुमंत साळुंखे (रा.पालवन तालुका माढा जिल्हा सोलापूर) याने तिला टेंभुर्णी, पुणे येथे पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी कुर्डूवाडी पोलीस स्टेशन येथे भा द वि 363, 366, 376 सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम 4, 8,12 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर प्रकरणी त्याला दिनांक 17/4 /2023 रोजी अटक करण्यात आली होती.
तर नंतर त्याने जामीन मिळणे कामी अॕड निखिल पाटील यांचे मार्फत बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायालय येथे जामीन अर्ज दाखल केला होता सदर जामीन अर्जाची सुनावणी बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश माननीय श्री जे .सी.जगदाळे यांच्या समोर झाली सदर अर्जाच्या सुनावणी वेळी आरोपीचे वकील अॕड निखिल पाटील यांनी त्यांचे युक्तीवादात सदरची मुलगी ही जवळपास 18 वर्षे वयाची असून दोघांमध्ये प्रेम संबंध आहेत तसेच त्यांनी स्वतःहून त्यांचे घर सोडलेले असून गुन्ह्याचा तपास पूर्ण होत आला आहे त्यामुळे आरोपीला जामीन देण्यात यावा असा युक्तिवाद केला सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी अभिजीत हनुमंत साळुंखे याची 50 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामिनावर मुक्तता करण्यात आली.