करमाळा : नंदन प्रतिष्ठान, श्रीराम नवमी उत्सव समिती आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिराचे आयोजन
करमाळा, दि. 18 (करमाळा-LIVE)-
करमाळ्यात नंदन प्रतिष्ठान, श्रीराम नवमी उत्सव समिती आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक योग दिन’ निमित्त 21 जून रोजी ‘विशेष योग शिबिर’ चे आयोजन करण्यात आले आहे.
योगाभ्यासामुळे मानवी जीवनात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते. योगाभ्यास आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जगभरात दरवर्षी 21 जून रोजी ‘जागतिक योग दिन’ साजरा केला जातो.
सद्यस्थितीमध्ये योगसाधनेला आपल्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग बनवणे गरजेचे झाले आहे. याच उद्देशाने या योग शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरात योग शिक्षक बाळासाहेब नरारे या योगाभ्यासाबद्दल आपणास मार्गदर्शन करणार आहेत. हे शिबिर श्रीसंत संताजीनगर येथे सकाळी 7.30 ते 8.30 या वेळेत होणार आहे. या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन नंदन प्रतिष्ठान चे अध्यक्ष तथा भाजपा व्यापार आघाडी चे शहराध्यक्ष जितेश कटारिया यांनी केले आहे.