18/12/2024

देवळाली : खून करून पुरावा नष्ट करणे, बलात्कार, जीवे मारण्याचा प्रयत्न, पोक्सो तसेच ॲट्रॉसिटी प्रकरणातून एकास जामीन मंजूर

0
IMG-20221210-WA0012-2.jpg

सदर प्रकरणी आरोपीतर्फे अॕड निखिल पाटील व अॕड दत्तप्रसाद मंजरतकर यांनी काम पाहिले.

करमाळा, दि. 21 (करमाळा-LIVE)-
खून करून पुरावा नष्ट करणे, बलात्कार, जीवे मारण्याचा प्रयत्न, पोक्सो तसेच ॲट्रॉसिटी प्रकरणातून एकास जामीन मंजूर झाला आहे.

या बाबत हकीकत अशी की, मौजे देवळाली (करमाळा) येथील अमोल सदाशिव शिंदे याने माधुरी अनिल वाठोरे (रा सोनूना, तालुका- लोणार, जिल्हा -बुलढाणा) हिचेेशी अनैतिक संबंध प्रस्थापित करून तिला करमाळा येथे भाड्याने रूम करून ठेवून तिचा खून करून प्रेताची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट केल्याबाबतचा गुन्हा दाखल झाला होता.

सदर बाबतची फिर्याद करमाळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सचिन सुधाकर जगताप यांनी दिनांक 04/06/2021 रोजी दाखल केली होती सदर प्रकरणी सुरुवातीला भा.द.वि कलम 306, 201, 504, 506, 176 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता व सदर प्रकरणी अमोल सदाशिव शिंदे यास अटक झालेली होती तदनंतर तपासा दरम्यान गुन्ह्यांमध्ये भा.द.वि.कलम 302 तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3 (2) (5) ,3 (2) (Va) वाढवण्यात आले व आरोपी विरुद्ध माननीय अतिरिक्त सत्र न्यायालय बार्शी येथे आरोपपत्र दाखल करण्यात आलेले होते दरम्यानच्या काळात अमोल सदाशिव शिंदे याचे विरुद्ध दिनांक 12/07/2021 रोजी बलात्काराचा व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्याचा दुसरा गुन्हा दाखल झाला होता सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध भादवि कलम 307 376(a) (b), 354,323,506,34 तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती कायदा कलम 3(1) (w), 3(1) (ii), 3(2) (va) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोक्सो) कलम 4,8 व 12 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता व सदर गुन्ह्याचे आरोपपत्र सुद्धा माननीय अतिरिक्त सत्र न्यायाधीश बार्शी यांच्यासमोर दाखल झाले होते.

सदर दोन्ही खटल्यांची सुनावणी माननीय अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री जे.सी.जगदाळे यांच्यासमोर सुरू होती सुनावणी दरम्यान खुनाच्या खटल्यात सरकारतर्फे एकूण 14 साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या तसेच बलात्कार व जीवे मारण्याचा प्रयत्न तसेच पोक्सो खटल्यामध्ये तीन साक्षीदारांच्या साक्षी अशा एकूण 17 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या होत्या तदनंतर आरोपीतर्फे अॕड निखिल पाटील यांनी आरोपीचा जामीन अर्ज दाखल केला होता सदर जामीन अर्जाच्या सुनावणी वेळी आरोपीचे वकील अॕड निखिल पाटील यांनी आरोपी विरुद्ध लावलेल्या आरोपाबाबत कोणताही सबळ पुरावा 17 साक्षीदार तपासून सुद्धा न्यायालयासमोर आलेला नसून खटला संपण्यास बराच कालावधी लागणार आहे तसेच इतर साक्षीदार जाणून-बुजून न्यायालयात उपस्थित राहत नाहीत अशा परिस्थितीत आरोपीस जामीनावर मुक्त करण्यात यावे असा युक्तिवाद करण्यात आला सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी अमोल सदाशिव शिंदे यास दोन्ही खटल्यातून जामीनावर मुक्त करण्याचा आदेश माननीय श्री जे .सी .जगदाळे साहेब अतिरिक्त सत्र न्यायाधीश बार्शी यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page