श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज जेऊर मुक्कामी येणार
जेऊर, दि. 22 (करमाळा-LIVE)-
नाशिक येथील त्रिंबकेश्वर येथून पंढरीला निघालेल्या श्री संत निवृत्तीनाथ महारांजाची पालखी आज करमाळा तालुक्यातील जेऊर मुक्कामी येणार असून प्रशासनातर्फे यासाठी तयारी करण्यात आलेली आहे.
जेऊर येथे आज संध्याकाळी 5 वाजता जेऊर गावात निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आगमण होईल. सुमारे पन्नास ते साठ हजार वारकऱ्यांचा समावेश असलेल्या निवृत्तीनाथ महारांजाची पालखी आज गुरूवारी जेऊर मुक्कामी राहणार असून शुक्रवारी सकाळी पंढरपूर कडे मार्गस्त होणार आहे असून शुक्रवार दि. 23 जूनला तालुक्यातील कंदर येथे मुक्कामी येणार आहे.
जेऊर परिसरातील नागरीकांनी तसेच प्रशासनाने जय्यत तयारी करून पालखी चे स्वागत करण्यात आले.