18/12/2024

एमएसईबच्या (MSEB) अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे करमाळा शहरासह 35 खेडी अंधारात ; कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची शिवसेनेची मागणी

0
images-65.jpeg

करमाळा, दि. 16 (करमाळा-LIVE)-
करमाळा शहरासाठी मांगी, पोटेगाव, जेऊर या तीन सब स्टेशन मधून वीज पुरवठा करण्याची सोय आहे. या ठिकाणी घोटाळा झाला तर इतर दोन ठिकाणाहून कुठूनही करमाळा शहराला लाईट वीज देता येते मात्र करमाळ्यातील एमएससीबी अधिकाराच्या भोंगळ कारभारामुळे आज सकाळी अकरा वाजल्यापासून करमाळा शहरासह तालुक्यातील 35 खेडे अंधारात असून एम एस ई बी च्या सर्व अधिकाऱ्यांनी आपले फोन बंद ठेवले आहेत.

यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असून संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यात कार्यात कसूर केल्याबद्दल नोकरीतून एक महिन्यासाठी निलंबित करावी अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे ई-मेल द्वारेकेली आहे केली आहे.

मांगी सब स्टेशन मधून देवीचा माळ येथील उपकेंद्रात वीज येते या विद्युत वाहिनीमध्ये घोटाळा झाला आहे असे समजून संबंधित वायरमनने दिवसभर त्या ठिकाणीच घोटाळा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्यक्षात हा घोटाळा अंडरग्राउंड वायर मध्ये देवीचा माळ सब स्टेशन जवळच झालेला होता. करमाळा शहराचा विद्युत पुरवठा दीर्घकाळ खंडित होऊ नये म्हणून पोटेगाव सब स्टेशन व जेऊर सब स्टेशन या दोन्ही ठिकाणाहून देवीचा माळ येथील उपकेंद्रा वीज वाहक यंत्रणा आहे. यंत्रणात गेली पाच वर्षापासून वापरली नसल्यामुळे ऐन वेळेस ती चालू करता आली नाही
व त्याचा उपयोग करता आला नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी फोन बंद ठेवल्यामुळे कोणाला काही प्रश्न विचारायचे व कोण उत्तर देणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे. करमाळा वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता एक महिन्याच्या दीर्घकालीन रजेवर गेलेले आहेत. मी त्यांचा चार्ज जेऊर येथील उपकेंद्राच्या अभियंत्याकडे दिलेला आहे. हे अभियंते सुद्धा रजा टाकून सुट्टीवर गेले आहेत. सक्षम अधिकारी नसल्यामुळे दुरुस्तीसाठी लागणारी केबल व त्याचा खर्च कोणी करायचा याचा निर्णय न झाल्यामुळे रात्री सायंकाळी सहा वाजेपर्यंत निर्णय प्रलंबित होता.

अखेर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी काही एम एस ई बी चे ठेकारदारांची संपर्क करून संबंधित दुरुस्ती साठी लागणाऱ्या साहित्याची बारामती येथून आणण्याची तरतूद केली असून रात्री एक वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरू होईल अशा आहे

अधिकारी सुट्टीवर गेल्याचा परिणाम
शनिवारपासून लागून सुट्टी असल्यामुळे सर्व महत्त्वाचे कर्मचारी रजेवर गेलेले आहेत. शनिवार, रविवार सुट्टी मंगळवारी स्वातंत्र्य दिनाची सुट्टी व आज पारशी दिनाची सुट्टी यामुळे सक्षम अधिकारी नसल्यामुळे करमाळा शहराचे 35 खेडी अंधारात आहेत याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page