05/01/2025

करमाळ्यात आढावा बैठक ; आगामी निवडणूका रासप स्वबळावर लढणार-  जिल्हाध्यक्ष रणजित सुळ

0
IMG-20230822-WA0011.jpg

करमाळा, दि. 22 (करमाळा-LIVE)-
करमाळा येथे राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित आढावा बैठक आज शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी पक्ष वाढीसाठी आणि येणाऱ्या सर्व स्थानिक निवडणूका स्वबळावर लढण्या संदर्भात विचार विनिमय करून नुतन पदाधिकारी परिचय व निवडी संदर्भात देखील चर्चा करून विविध आघाड्यांच्या निवडी करण्यात आल्या.

यामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष माढा लोकसभा संपर्कप्रमुख पदी भैरवनाथ सलगर, करमाळा तालुका प्रभारी नामदेव पालवे, तालुका उपाध्यक्ष डॉ गणेश हाके, तालुका उपाध्यक्ष रावसाहेब बिनवडे, तालुका कार्याध्यक्ष  शिवाजी नलावडे, तालुका संघटक काकासाहेब शिंदे, पदवीधर तालुका अध्यक्ष संभाजी पालवे, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष जहाॅंगीर पठाण, युवा कार्याध्यक्ष विजय शिंदे, तालुका संपर्कप्रमुख विकास मेरगळ, केम शहर अध्यक्ष पदी सुरज धोत्रे इत्यादींच्या निवडी करण्यात आल्या.

या बैठकीस राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रणजित सुळ, संपर्कप्रमुख गोरख वाकडे, जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, माढा लोकसभा उपाध्यक्ष माळाप्पा खांडेकर, युवक जिल्हाध्यक्ष दामाजी मिटकरी, बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम, बाळासाहेब टकले, यांनी  देखील उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी रासपचे जिल्हा अध्यक्ष सुळ म्हणाले की, देशातील सर्व बहुजन समाजाला सोबत घेऊन माजी मंत्री महादेव जानकर यांचे नेतृत्व सक्षम होत चालले आहे. रासप हा कष्टकरी,शेतकरी, वंचित, पिडीत घटकांतील बहुजनांचा पक्ष आहे.

या पक्षात युवकांनी जास्तीत जास्त सामिल ह्वावे.पक्षाचे महाराष्ट्रासह अन्य च्यार राज्यांत जोरदार काम सुरू आहे. येणारा काळ रासप पक्षासाठी अतिशय चांगला आसेल. त्यामुळे तालुक्यातील सर्व आघाड्या पूर्ण करून वन बुथ टैंन युथ ची बांधणी व गाव तिथे कार्यकर्ता आणि शाखा काढाव्यात. त्याच बरोबर पुणे येथे पक्षाच्या २९ ऑगस्ट रोजी २०व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातून एक हजार गाड्यांच्या ताफ्यासह इंदापूर, बारामती,पूरंदर, खडकवासला, भागातून पुणे स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच, येथे २९ रोजी जिल्ह्यातून पंधरा हजार कार्यकर्ते जाणारा आहेत. त्यामुळे तालुक्यातून आपणही जास्तीत जास्त संख्येने पुणे येथील मेळाव्यास उपस्थितीत राहाण्याचे आव्हान सुळ यांनी केले आहे.

यावेळी माढा तालुकाध्यक्ष बंडू शिंदे, कुर्डूवाडी शहराध्यक्ष सोमनाथ देवकते उमरडचे माजी सरपंच संदीप मारकड, सुहास ओहळ, मिरगव्हणचे सरपंच संतोष लावंड, पत्रकार प्रविण मखरे, भैरवनाथ सलगर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या आढावा बैठकीस योगेश पालवे, राजेंद्र जाधव,संभाजी पालवे, विकास मेरगळ, जहांगीर पठाण, बंडू शिंदे, संदीप मारकड, प्रवीण मखरे, सुरज धोत्रे, सुधीर ठोंबरे, सचिन काकडे, विलास शिंदे, कामोणे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर खरात, मच्छिंद्र हाके, हनुमंत नाळे, डॉ.गणेश हाके, नामदेव पालवे, धनंजय काळे, माऊली खरात, विलास मारकड, रावसाहेब बिनवडे, शंकर सुळ, शंकर राऊत, जगन्नाथ सलगर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

तालुका अध्यक्ष जीवन होगले यांच्या नेतृत्वात ही बैठक संपन्न झाली. यावेळी प्रस्ताविक अंगद देवकते यांनी तर आभार भैरु सलगर यांनी मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page