17/12/2024

सोशल मिडीयाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपीला दीड वर्षांनी जामीन मंजूर

0
IMG-20221210-WA0012-2.jpg

आरोपीच्या वतीने अॕड भाग्यश्री मांगले-शिंगाडे व अॕड अमर शिंगाडे यांनी काम पाहिले.

करमाळा, दि. 25 (करमाळा-LIVE)-
सोशल मिडीयावरील इंस्टाग्राम, व्हट्सअप, फेसबुक वरून ओळख करून बलात्कार व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्ह्यातून आरोपीला जामीन मंजूर झाला आहे.

याबाबत हकीकत अशी की, उस्मानाबाद जिल्ह्यातील आरोपीची इंस्टाग्राम, फेसबुक तसेच व्हाट्सअप ह्या मोबाईल ॲपद्वारे करमाळा तालुक्यातील एका मुलीशी ओळख झाली, या ओळखीचे रूपांतर गुन्हा घडण्यामध्ये झाले. मुलगा सदर मुलीला भेटण्याकरिता उस्मानाबाद जिल्ह्यातून करमाळा तालुक्यात आला. भेटल्यानंतर आरोपीने अल्पवयीन मुलीवरती दोन मित्रांच्या सहाय्याने तिच्यावर लॉज येथे अतिप्रसंग केला, तद्नंतर संशयीत आरोपीवरती करमाळा पोलीस स्टेशन येथे आयपीसी कलम 376, 354, 354(A), 323, 504, 506, 34 तसेच पोस्को कलम 4, 6, 8, 12, 17 कायद्या अंतर्गत 10 जानेवारी 2022 रोजी गुन्हा दाखल होऊन अटक झाली होती.

आरोपीचा माननीय जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय बार्शी येथील जामीन फेटाळल्यानंतर आरोपीने मुंबई उच्च न्यायालय येथे जामीनकरिता धाव घेतली. आरोपीच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालय समोर युक्तिवाद केला. आरोपींच्या वकीलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून माननीय उच्च न्यायालयाने आरोपीस शर्ती व अटी तसेच तीस हजारांच्या जातमुचलक्यावर तब्बल 604 दिवसानंतर म्हणजेच तब्बल 19 महिने 15 दिवसानंतर जामीन मंजूर झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page