पिंपळवाडी ग्रामपंचायतवर जगताप गटाची सत्ता ; सरपंचपदी शारदा बरडे बिनविरोध
करमाळा, दि. 25 (करमाळा-LIVE)-
पिंपळवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी जगताप गटाच्या शारदा रामचंद्र (बाळू) बरडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
निवड झाल्याबदल त्यांचा सत्कार जगताप गटाचे युवानेते करमाळा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन शंभुराजे जगताप यांच्या हस्ते झाला.
यावेळी उपसरपंच वैशाली दत्तात्रय चव्हाण, अमोल जाधव, माजी सरपंच मदन रामचंद्र पाटील, दत्तात्रय चव्हाण, मजनू शेख, सुनील काळे, रमेश काळे, हनुमंत वीर, दगडू थोरात, बाळासाहेब बरडे, सुरज पाटील, आदित्य जाधव, सुरेश कांबळे, अभिजित चव्हाण, दादासाहेब चव्हाण, भास्कर गायकवाड आदी उपस्थित होते.