सकल मराठा समाजाचा यल्गार : जेऊर 100 टक्के बंद



जेऊर, दि. 3 (करमाळा-LIVE)-
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे म्हणून अंतरवाली सराटा (जि.जालना) येथे उपोषण करणाऱ्या मराठा समाजातील माता भगिनींवर अमानुष लाठी हल्ला व गोळीबार झाला त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्र मध्ये उमटले त्या घटनेच्या निषेधार्थ आज जेऊर सह चिखलठाण, वांगी गावांमध्ये बंद पाळून निषेध करण्यात आला.
यावेळी बोलताना संभाजी ब्रिगेड चे प्रवक्ते बाळासाहेब तोरमल बोलताना म्हणाले की, झालेल्या घटनेची सखोल चौकशी करून लवकरात लवकर त्यावर कडक कारवाई करण्यात यावी. व घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन सकल मराठा समाजाची माफी मागावी अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली.
यावेळी पुकारलेल्या बंदला मराठा समाजाने जेऊर व्यापारी वर्गाने व जेऊर ग्रामस्थांनी 100% पाठिंबा देत कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडच्यावतीने जेऊर आऊट पोस्टचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंजीर साहेब यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष अतुल निर्मळ, तालुकाध्यक्ष सुहास पोळ, नाना पोळ, पिंटु जाधव, आदिनाथ माने, बालाजी गावडे, सोमनाथ रोकडे, दत्तात्रेय आहेरकर, मयूर रोकडे, आबा झाडे, निलेश पाटील, धनु गारुडी, शुभम रोकडे, राजेश रोकडे, महेश शिंदे, वैभव मोहिते, किशोर कदम, नागेश खराडे, जय चोपडे, हनुमंत आदलिंग, किरण गायकवाड, शुभम सूर्यवंशी शंकर जाधव, गणेश मोहिते, संतोष कांबळे, अविनाश घाडगे, आजिनाथ पांढरमिसे, सकल मराठा समाज व असंख्य बहुजन बांधव उपस्थित होते.

- भारत प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील व भेटकार्ड
- सोलापूर सामाजिक वनीकरण विभागाकडुन आयोजित स्पर्धेत जेऊरच्या भारत हायस्कूलची आरूषी बादल प्रथम तर शिवानी कुंभार तृतीय
- स्वतःचा कारखाना विकणाऱ्या माजी आमदार शिंदे आणि त्यांच्या गटाने आदिनाथची काळजी करू नये- पाटील गट
- जेऊर येथील ओंकार पोळ याचे प्रथम पुण्यस्मरण ; केम व शेटफळ येथे विद्यार्थ्यांना भोजन व शालेय साहित्यांचे वाटप
- कोर्टीच्या सरपंच भाग्यश्री नाळे-मेहेर यांना ग्रामररत्न सरपंच पुरस्कार जाहीर

