केत्तूरच्या श्री किर्तेश्वर देवस्थान अन्नछत्र समितीच्या अध्यक्षपदी धनाजी खाटमोडे-पाटील

केत्तूर, दि. 8 (करमाळा-LIVE)-
केत्तूर येथील ग्रामदैवत श्री किर्तेश्वर देवस्थान येथे दर सोमवारी मोठ्या प्रमाणात महाप्रसाद होत असून या महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आणि श्रावण महिन्यातील चार सोमवार, महाशिवरात्री आणि श्री किर्तेश्वर देवस्थान संबंधात इतर उत्साह संदर्भात अन्नादानाचे नियोजन करणे बाबत श्री किर्तेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट च्या ट्रस्टींनी श्री किर्तेश्वर देवस्थान अन्नछत्र समितीची स्थापना केली असून समितीच्या अध्यक्षपदी धनाजी अंबादास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री पाटील हे महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे खात्याचे निवृत्त अधिकारी असुन त्यांनी महाराष्ट्र राज्य पाटबंधारे कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी काम केले असून करमाळा गृह निर्माण संस्थेचे सचिव म्हणून ही त्यांनी कामकाज पाहिले आहे.
माझ्या हातून श्री किर्तेश्वर देवाची सेवा होणे मी भाग्याचे समजतो श्री किर्तेश्वर देव हे जागृत देवस्थान असून ट्रस्टींनी जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे ती मी उत्तम प्रकारे पार पाडणार आहे.
धनाजी खाटमोडे-पाटील, नूतन अध्यक्ष श्री किर्तेश्वर अन्नछत्र समिती
- दहिगावं उपसा सिंचन योजनेची सर्व बिल आकारणी पुर्वरत ; आवर्तन वाढीस मदत मिळणार- आमदार नारायण आबा पाटील
- शेटफळ येथे कृषी विभागाच्या वतीने शिवार फेरीचे आयोजन ; महिलांना दिले प्रशिक्षण
- करमाळा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्रमांक पाच मध्ये जगताप विरूद्ध जगताप ‘काटे की टक्कर’
- ३० नोव्हेंबरला कोर्टी येथे मोफत मुळव्याध उपचार शिबीराचे आयोजन
- केळी उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार नारायण आबा पाटील अग्रेसर ; विरोधकांचे निवेदन म्हणजे वराती मागून कागदी घोडे- प्रवक्ते सुनील तळेकर


