‘आबा’ हे नाव आम्ही स्वतःहा पेक्षा जास्त जपतो ; सोशल मिडीयावर माजी आमदार नारायण आबांच्या व्हिडीओ ची चर्चा


जेऊर, दि. 10 (करमाळा-LIVE)-
‘आबा’ हे नाव आम्ही स्वतःहा पेक्षा जास्त जपतो असा व्हिडीओ सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत असून माजी आमदार नारायण आबांचा या व्हिडीओ ची चर्चा सर्व तालुकाभर सुरू आहे.
शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे गेल्या 20 वर्षापासून मी कार्य समोरून पाहिलेले आहे त्यांची कार्य करण्याची शैली, दिनदुबळ्यांबद्दल असलेली त्यांची ओढ, ज्येष्ठांचा आदर करणे, आणि जेऊर ग्रामपंचायत मध्ये जो कोणी व्यक्ती येईल त्याचे शंभर टक्के काम करणे ही आबांची मी तर म्हणतो हॉबीच आहे, माझे जेवढे वय आहे तेवढा आबांचा समाजकारणाचा तजूरबा आहे. कारण 1990-91 सालापासून आबा लोकांच्या सेवेमध्ये आहेत, कोणताही मोठा राजकीय वारसा नसताना, आबा जेऊर चे सरपंच, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य आणि 2014 ला आमदार झाले, आबांचे कार्यकर्ते देखील सर्व आबांच्या विचाराने बनलेले आहेत, आबा आणि कार्यकर्त्यांमध्ये एक चांगल्या पद्धतीची नाळ जोडलेली आहे, आबांना भेटायसाठी अनेक गावातून लोक येतात त्यांना डायरेक्ट एन्ट्री असते, बाकी ठिकाणची तुम्ही परिस्थिती बघता कशी असते, परंतु आबांची शैली ही राजकारण नसून समाजकारण आहे. आबांनी कधीही कोणालाही म्हणले नाहीत की तू या गटाचा तू त्या गटाचा प्रत्येकाची कामे केली आणि ते निरंतरच करत राहणार, आमच्या विभक्त वांगी ग्रामपंचायत मध्ये आबाचा सिंहाचा वाटा आहे, ग्रामपंचायत विभक्त झाल्याच्या नंतर आबांनी सांगितले ग्रामपंचायत वरती निवडताना लोक चांगले निवडा, तो कोणत्या गटाचा हे महत्त्वाचं नाही परंतु काम करणारी लोकच निवडा अशे आहेत. आबा निश्चितच या चांगल्या कामाचं फळ आबांच्या माध्यमातून 2014 ते 19 या कालखंडामध्ये करमाळा -माढा मतदार संघामधील जनतेला पहायला मिळाले कारण तेराशे ते चौदाशे कोटी निधी या मतदारसंघाला खेचून आणण्याचे कार्य आबांनी केले आणि निश्चितच सांगतो 2024 ला देखील आबा तुम्हीच आमदार होणार आणि ही जनता तुम्हाला पुन्हा एकदा करमाळा – माढा मतदार संघाची सेवा करण्याची संधी देणार, कारण तुमच्याशिवाय कोणीच करमाळा माढा मतदारसंघाचा विकास करू शकत नाहीत.
विशाल तकिक-पाटील, युवानेते
- भारत प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील व भेटकार्ड
- सोलापूर सामाजिक वनीकरण विभागाकडुन आयोजित स्पर्धेत जेऊरच्या भारत हायस्कूलची आरूषी बादल प्रथम तर शिवानी कुंभार तृतीय
- स्वतःचा कारखाना विकणाऱ्या माजी आमदार शिंदे आणि त्यांच्या गटाने आदिनाथची काळजी करू नये- पाटील गट
- जेऊर येथील ओंकार पोळ याचे प्रथम पुण्यस्मरण ; केम व शेटफळ येथे विद्यार्थ्यांना भोजन व शालेय साहित्यांचे वाटप
- कोर्टीच्या सरपंच भाग्यश्री नाळे-मेहेर यांना ग्रामररत्न सरपंच पुरस्कार जाहीर

