17/12/2024

गौंडरे येथील ‘वसुंधरा परिवार’ ठरला तालुक्यातला सर्वश्रेष्ठ परिवार

0
IMG-20231026-WA0040.jpg

करमाळा, दि. 26 (करमाळा-LIVE)-
भाजपचे करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीत, पारंपारिक भजन, लोकसंगीत, शालेय संगीत अशा विविध स्पर्धांचे आयोजन शहरातील दत्त मंदिर येथे करण्यात आले.

या स्पर्धेसाठी तालुक्यातून शंभराच्या पुढे स्पर्धकांनी भाग घेऊन उदंड प्रतिसाद दिला. वेगवेगळ्या संगीत प्रकारामध्ये तालुक्यातील सर्वपरिचित ‘वसुंधरा परिवार महाराष्ट्र राज्य’ च्या गौंडरे या संघाने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत गौरवपूर्ण कामगिरी केली.

वयक्तिक भजन स्पर्धेतून महादेव बळीराम अंबारे यांचा प्रथम क्रमांक आला आहे. तर लोकसंगीत स्पर्धेतून हनुमंत माणिक काळे यांचा प्रथम क्रमांक आला आहे. लोकसंगीतातून उत्तेजनार्थ बक्षीस हे याच परिवारातील सदस्य वत्सला विजय हराळे यांनी पटकवले तर शास्त्रीय संगीतातून उत्तेजनार्थ बक्षीस संगीता चिंचकर यांनी मिळवले आहे. वरील सर्व वसुंधरा परिवाराच्या विजयी स्पर्धकांनी अभिमानास्पद कामगिरी केल्याने तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. वसुंधरा परिवार हा निसर्ग संवर्धनाचे, संगीत क्षेत्रात, तसेच सामाजिक क्षेत्रात प्रामाणिक काम करून कमी कालावधीत या परिवाराची ख्याती सर्वदूर पसरली आहे. ‘भारतीय संगीत गाऊ भारतीय वृक्ष लावू’ या विचाराने समाजात फार मोठे कार्य हा पारिवार करत आहे. आज या विजयी स्पर्धकांनी या परिवाराच्या वाटचालीत गौरवपूर्ण मानाचा तुरा रोवल्याने याचा संपूर्ण तालुक्याला आभिमान आहे असे गौरोद्गार वसुंधरा परिवार महाराष्ट्र राज्य चे सर्वेसर्वा विजय खंडागळे यांनी आमच्या प्रतीनिधींशी बोलताना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page