अभिनेत्री अक्षता कांबळी राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानीत



करमाळा, दि. 1 (करमाळा-LIVE)-
आधार सामाजिक सेवा संस्था महाराष्ट्र यांच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल) येथे राज्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अभिनेत्री अक्षता कांबळी यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त असलेल्या ह.भ.प.डॉ. सौ. मनीषाताई गुरव (नाडी तज्ञ) व आधार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिनेश मेटकरी यांच्या हस्ते कांबळी यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
गेली पंधरा वर्षे अभिनय क्षेत्राबरोबर समाजसेवेचाही वसा जोपासणाऱ्या अक्षताताई यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला आहे. यावेळी कराड चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, आयुश भारत डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.अमीर मुलाणी, कराड शहर पोलिस उपनिरीक्षक सौ. रेखा देशपांडे, अभिनेते बलराज माने, अभिनेते गौरव भोसले, अभिनेता निर्माता आदित्यराजे मराठे, अभिनेत्री ऐश्वर्या धौड, अभिनेत्री श्रुतिका सावंत, संभाजी ब्रिगेड चित्रपट संस्था पुणेचे अध्यक्ष प्रकाश धिंडले, दिग्दर्शक व्यंकटेश कदम उपस्थित होते.
- भारत प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील व भेटकार्ड
- सोलापूर सामाजिक वनीकरण विभागाकडुन आयोजित स्पर्धेत जेऊरच्या भारत हायस्कूलची आरूषी बादल प्रथम तर शिवानी कुंभार तृतीय
- स्वतःचा कारखाना विकणाऱ्या माजी आमदार शिंदे आणि त्यांच्या गटाने आदिनाथची काळजी करू नये- पाटील गट
- जेऊर येथील ओंकार पोळ याचे प्रथम पुण्यस्मरण ; केम व शेटफळ येथे विद्यार्थ्यांना भोजन व शालेय साहित्यांचे वाटप
- कोर्टीच्या सरपंच भाग्यश्री नाळे-मेहेर यांना ग्रामररत्न सरपंच पुरस्कार जाहीर

