जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रास सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी पाटलोजी चव्हाण यांनी दिली भेट



जेऊर, दि. 7 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रास सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी पाटलोजी चव्हाण यांनी आज भेट देऊन आढावा घेतला.
यावेळी श्री चव्हाण यांनी राष्ट्रीय टाकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत हिवताप, डेंग्यू, चिकुन गुनिया आदी आजारा विषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले.
यावेळी जेऊर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॕ कानडे व जेऊर ग्रामपंचायत नवनिर्वचित सदस्य सचिन निमगिरे, इकबाल पठाण, उमेश मोहिते, माजी सदस्य विनोद गरड यांनी श्री.चव्हाण यांचा सन्मान केला.
यावेळी आबासाहेब झिंजाडे, मनोज पद्माळे, नवनाथ शिंदे, प्रशांत टोणे, उपस्थित होते.
- भारत प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील व भेटकार्ड
- सोलापूर सामाजिक वनीकरण विभागाकडुन आयोजित स्पर्धेत जेऊरच्या भारत हायस्कूलची आरूषी बादल प्रथम तर शिवानी कुंभार तृतीय
- स्वतःचा कारखाना विकणाऱ्या माजी आमदार शिंदे आणि त्यांच्या गटाने आदिनाथची काळजी करू नये- पाटील गट
- जेऊर येथील ओंकार पोळ याचे प्रथम पुण्यस्मरण ; केम व शेटफळ येथे विद्यार्थ्यांना भोजन व शालेय साहित्यांचे वाटप
- कोर्टीच्या सरपंच भाग्यश्री नाळे-मेहेर यांना ग्रामररत्न सरपंच पुरस्कार जाहीर

