17/12/2024

शेटफळच्या जिव्हाळा ग्रुप व शिवस्मारक समितीच्या वतीने किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन

0
IMG-20231109-WA0044.jpg

चिखलठाण, दि. 10 (करमाळा-LIVE)-
शेटफळ येथील जिव्हाळा ग्रुप व शिवस्मारक समितीच्या वतीने जरवर्षी प्रमाणे यावर्षीही दीपावली निमित्त भव्य किल्ला बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी या निमित्ताने आवाहन करण्यात येत आहे.

परिसरा बाहेरील मुलांनी किल्ल्यासोबत चा फोटो पाठवल्यास त्यांनाही सहभागाबद्दल डिजिटल प्रमाणपत्र मिळणार आहे. सध्याच्या इंटरनेटच्या युगात मुलांचे बालपणच हरवून गेले आहे मोबाईल पासून दूर होऊन काही काळ तरी आपली मुलं मातीशी एकरूप व्हावी. या हेतूने गेल्या नऊ वर्षापासून या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे महाराष्ट्रातील गडकोट म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे वैभव व आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची साक्ष असणारी स्मारके आहेत त्यांचे जतन व संवर्धन होणे गरजेचे आहे याची जाणीव आपल्या मुलांमध्ये निर्माण व्हावी यासाठी सुट्टीच्या दिवसात आपली मुलांनी मोबाईल पासून काही काळ दूर राहून स्वच्छंदी बालपणाचा अनुभव घ्यावा यासाठी येथील जिव्हाळा ग्रुपच्या वतीने 14 नोव्हेंबर रोजी या किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन केले आहे. परिसरातील स्पर्धकांनी आपल्या घराच्या परिसरात दगड मातीच्या मदतीने किल्ला बांधणी करायची असून यामधील उत्कृष्ट किल्ले बांधण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस देऊन स्पर्धकांचा सन्मान केला जाणार आहे.

या स्पर्धेत नाव नोंदणी व अधिक संपर्कासाठी प्रशांत नाईकनवरे-8830692423, महेश सातपुते-7414967003 यांच्याशी संपर्क साधण्याचे आव्हान केले आहे.

स्पर्धा फक्त शेटफळ परिसरापुरती मर्यादित असली तरी बाहेरील परिसरातील किल्ले बांधणी केलेल्या मुलांनी आपला किल्ला बरोबर काढलेला फोटो 9960471266 या व्हट्सअप क्रमांकावर पाठवल्यास त्यांना किल्ले बांधणी स्पर्धेत सहभागाबद्दल डिजिटल प्रमाणपत्र पाठवले जाईल अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page