18 वर्षांंनंतरही मैत्री आजही कायम ; जेऊरच्या भारत हायस्कूलच्या 2005 सालच्या बॕच ने केले गेट-टू-गेदर
जेऊर, दि. 13 (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील भारत हायस्कूलमध्ये अठरा वर्षांपूर्वीच्या दहावीतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन जुन्या आठवणी जागवल्या.
नोकरी व्यवसाय निमित्त विविध ठिकाणी असणाऱ्या भारत हायस्कूल जेऊर येथे 2005 साली दहावी मध्ये असणाऱ्या वर्गमित्रांनी एकत्र येऊन स्नेहमेळावा घेण्याचे ठरवले या बॅचमधील बरेचसे विविध ठिकाणी नोकरी, व्यावसायिक, अधिकारी तर कुणी वेगवेगळ्या खात्यामध्ये कर्मचारी तर काही जणांनी शेती सांभाळून आपल्या कुटुंबाची प्रगती करत आहे.
जेऊरच्या भारत हायस्कूलच्या 2005 साल च्या बॕचने ‘भारत हायस्कूल जेऊर’ या व्हट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्रितपणे येऊन सर्वांनी एकमेकांनाशी संपर्क केला आणि सर्वांनी एकत्र येण्याची कल्पना मांडली सर्वांनाच ती आवडली तात्काळ सर्वांनी होकार दिला दिवस ठरला वेळ ठरली. ती म्हणजे दिवाळीची.
यावेळी वर्ग मित्र एकत्र आले. शालेय जीवनात असताना घडलेल्या वेगवेगळ्या घटनांची आठवण निघाली. सुख, दुःख, भावनिक, काॕमेडी अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्या, त्याच बरोबर वर्षातून किमान दोन वेळा भेटण्याचे ही यावेळी ठरविण्यात आले. रात्री कुंभेज फाटा येथील सुप्रिम हॉटेल येथे जेवणाचा कार्यक्रम झाला.
यावेळी पनवेल येथील पोलीस उपनिरिक्षक नागेश शिरसकर, करमाळा-LIVE चे संपादक गौरव मोरे, मीरा फायनान्स चे साहिल सय्यद, ओम कॉम्प्यूटरचे सिध्दिविनायक जाधव, आर. राठोड ज्वेलर्सचे राहुल राठोड, सुरज ज्वेलर्सचे विनीत गादिया, बागायदार गुरूदास सुर्वे, नॕशनल मोटार चे अहमद मुलाणी, अक्षय किराणा चे अक्षय राठोड, संदेश मेडिकलचे संदेश शहा, इंजिनियर संदिप शिंदे, इंजिनियर राजेंद्र सुतार, इंजिनियर निरंजन घोरपडे, प्रितम पेट्रोलियम चे मॕनेजर अनिकेत काळेल आदी वर्ग मित्र उपस्थितीत होते.
- रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरीच्या जाचक अटी शिथिल करा- भाजप जिल्हा सचिव लक्ष्मण केकान
- करमाळ्यात मराठा कुणबी प्रकरणासाठी अडवणूक ; ऐजंट आणि अधिकाऱ्यांमध्ये मिलीभगत- युवासेनेचा धरणे आंदोलनाचा इशारा
- भाळवणीच्या तृप्ती वाघमारे चे नीट (NEET) परीक्षेत घवघवीत यश
- कुंभेजच्या बागल विद्यालयात केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धांचे आयोजन
- २०१४ ला २५७ चा मटका नव्हता, जनतेचा कौल होता! हे २०२४ लाही जनतेने दाखवून दिले ; विरोधकांना पाटील गटाचा “हाबाडा”