उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी एकनिष्ठ पणे उभा रहाणे हीच स्व बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली- शंभूराजे फरतडे
करमाळा, दि. 17 (करमाळा-LIVE)-
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे युवासेनाप्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या पाठीशी एकनिष्ठ पणे उभा रहाणे हीच खरी स्व बाळासाहेबांना श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन युवा सेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी व्यक्त केले.
युवासेना संपर्क कार्यालयात शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या ११ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले या वेळेस फरतडे बोलत होते. यावेळी शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे शहरप्रमुख प्रवीण कटारीया यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अधिक बोलतना फरतडे म्हणले की, शिवसेनाप्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांनी शेवटच्या भाषणात उद्धव साहेब व आदित्य साहेब यांच्या पाठिशी एकनिष्ठ रहा आदेश दिला मात्र काही बाप चोरणाऱ्या टोळींनी ठाकरे परिवाराच्या पाठीत खंजीर खुपसून गद्दारी केली आहे मात्र निष्ठावंत शिवसैनिक शेवटच्या श्वासापर्यंत ठाकरेंसोबत रहातील हिच खरी स्व बाळासाहेबांना श्रद्धांजली ठरेल असे मत व्यक्त केले. या वेळेस शिवसेना मा तालुकाप्रमुख शाहूदादा फरतडे, शहरप्रमुख प्रवीण कटारीया, उपशहरप्रमुख आदित्य जाधव यांनी देखील विचार व्यक्त केले. युवासेना शाखा प्रमुख ओकांर कोठारे, मयुर तावरे, विनोद पाटील, भाऊ मस्तुद बालाजी वाडेकर, संतोष वायकर, कालिदास कदम, शाखा प्रमुख मोतीराम फरतडे, नवनाथ फरतडे, कृष्णा बोराडे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
- येत्या गुरूवारी जेऊरच्या भारत शैक्षणिक संकूलाचे ६५ वे वार्षिक स्नेहसंमेलन ; डॉ वसंत हंकारे यांचे व्याख्यान होणार
- जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी
- जेऊरच्या भारत हायस्कूलचे बाळासाहेब शिंदे ‘ज्योतिबा-सावित्री’ जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानीत
- कोंढेज : आदलिंग वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
- हिवरे येथील जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी