17/12/2024

करमाळा : संभाजी ब्रिगेडच्या वतीने कृषी मंडल कार्यालयाला ठोकले टाळे

0
IMG_20231130_164025.jpg

करमाळा, दि. 30 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील कृषी मंडल कार्यालयाला संभाजी ब्रिगेडच्या वतीने टाळे ठोकले आहे.

गेल्या 2-3 वर्षांपासून कार्यालय बंद असल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले आहे व कार्यालयाला केत्तूर मंडल कार्यालय नावाची साधी पाटी सुद्धा नाही, केत्तूर मंडल येथील शेतकऱ्यांच्या आमच्याकडे वारंवार तक्रारी येत असल्याने संभाजी ब्रिगेडने आंदोलन केले आहे कृषी मंडल अधिकारी, सुपरवायझर, कृषी सहाय्यक हे तेथे उपस्थित नसतात आणि ते बाहेरच्या जिल्ह्यात राहतात करमाळा तालुक्यातील चार कृषी मंडळ कार्यालय असून करमाळा, जेऊर, केत्तूर आणि केम हे कार्यालय तेथे नावापुरतेच आहेत काय सर्व अधिकारी त्यांची वैयक्तिक कामे, घरगुती कामे करत बसतात व कार्यालयाच्या ठिकाणी कधीच उपस्थित नसतात तरी सर्व अधिकाऱ्याने कार्यालयाच्या ठिकाणी उपस्थित राहून सर्व शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी व ज्या काही शासकीय योजना आहेत त्या शेतकऱ्यांना बांधावर जाऊन व चावडी वाचन करून सर्व शेतकऱ्यांना सर्व योजना ची माहिती द्यावी असे चालू न राहिल्यास तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब यांना घेराव घालून त्याचा जाब विचारला जाईल.

तसेच कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांना घेराव घातला जाईल कृषिमंत्री, कृषी आयुक्त, कृषी संचालक, कृषी सहसंचालक, जिल्हा कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी यांना लेखी निवेदन फोटो सहीत पाठवून देण्यात येणार आहे.

यावेळी टाळा ठोको आंदोलन करताना उपस्थिती संभाजी ब्रिगेड करमाळा तालुकाध्यक्ष सुहास पोळ, मराठा सेवा संघाचे तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब झोळ, जेऊर शहराध्यक्ष अतुल निर्मळ, ऋषी टापरे, नाना पोळ, बाळासाहेब तोरमल आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page