करमाळा : आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने ‘पेन्शन दिवस’ साजरा ; कार्यक्रमात गुणवंतांचा सन्मान



करमाळा, दि. 17 (करमाळा-LIVE)-
आजी-माजी सैनिक संघटनेचा ‘पेन्शन दिवस’ पंचायत समिती हॉल करमाळा येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्हा सैनिक संघटनेचे व महाराष्ट्र राज्य त्रिदल सैनिक संघटनेचे अध्यक्ष अंकुश खोटे उपस्थित होते. या समारंभप्रसंगी कमलाभवानी शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल जातेगावं चे शहीद जवान पुत्र विनोद वारे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच करमाळा तालुक्यातील जातेगावंचे माजी सैनिक हनुमंत शिंदे यांची कन्या स्नेहल शिंदे हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत असिस्टंट को-ऑपरेटिव्ह ऑफिसर या पदावर निवड झाल्याबद्दल तिचा सन्मान करण्यात आला.
सर्व पेन्शनर सैनिकांनी या कार्यक्रमादरम्यान केक कापून पेन्शन दिवसाचा आनंद साजरा केला. याप्रसंगी आजी-माजी सैनिक कल्याणकारी संघटनेचे तालुका अध्यक्ष अक्रूर शिंदे यांनी मार्गदर्शन केले तर किरण ढेरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त मानले.
या समारंभासाठी करमाळा तालुक्यातील सर्व आजी-माजी सैनिक, वीर माता, वीर पिता, वीर पत्नी तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी व समाननीय सदस्य उपस्थित होते.


- भारत प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील व भेटकार्ड
- सोलापूर सामाजिक वनीकरण विभागाकडुन आयोजित स्पर्धेत जेऊरच्या भारत हायस्कूलची आरूषी बादल प्रथम तर शिवानी कुंभार तृतीय
- स्वतःचा कारखाना विकणाऱ्या माजी आमदार शिंदे आणि त्यांच्या गटाने आदिनाथची काळजी करू नये- पाटील गट
- जेऊर येथील ओंकार पोळ याचे प्रथम पुण्यस्मरण ; केम व शेटफळ येथे विद्यार्थ्यांना भोजन व शालेय साहित्यांचे वाटप
- कोर्टीच्या सरपंच भाग्यश्री नाळे-मेहेर यांना ग्रामररत्न सरपंच पुरस्कार जाहीर