येत्या मंगळवारी जेऊरच्या भारत शैक्षणिक संकूलाचे 64 वे वार्षिक स्नेहसंमेलन
जेऊर, दि. 5 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथील भारत शैक्षणिक संकूलाच्या वतीने 64 वे स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दि. 9 जानेवारी रोजी दुपारी 2.00 वाजता स्नेहसंमेलन होणार असून त्यामध्ये विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.
स्नेहसंमेलनाला प्रमुख प्रवक्ते म्हणून प्रसिध्द इतिहास संशोधक प्रा. डॉ श्रीमंत कोकाटे उपस्थितीत राहणार असून स्नेहसंमेलन अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध उद्योगपती नारायण शेठ आमृळे उपस्थितीत राहणार आहेत.
मंगळवारी 9 जानेवारीला दुपारी 2.00 वाजता माजी विद्यार्थी मेळावा तसेच पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. बुधवारी 10 जानेवारीला दुपारी 2.00 वाजता कलापथकाचे आयोजन करण्यात असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नारायण पाटील, उपाध्यक्ष अनिल गादिया, पर्यवेक्षक प्रा. अर्जून सरक, प्राचार्य केशव दहिभाते, उपप्राचार्य एन.डी. कांबळे, पर्यवेक्षक बी.एस शिंदे, प्राचार्य अनंत शिंगाडे आणि मुख्यध्यापक दीपक व्यवहारे, स्नेहसंमेलन चिटणीस श्री पाटकूलकर यांनी दिली आहे.
- रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरीच्या जाचक अटी शिथिल करा- भाजप जिल्हा सचिव लक्ष्मण केकान
- करमाळ्यात मराठा कुणबी प्रकरणासाठी अडवणूक ; ऐजंट आणि अधिकाऱ्यांमध्ये मिलीभगत- युवासेनेचा धरणे आंदोलनाचा इशारा
- भाळवणीच्या तृप्ती वाघमारे चे नीट (NEET) परीक्षेत घवघवीत यश
- कुंभेजच्या बागल विद्यालयात केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धांचे आयोजन
- २०१४ ला २५७ चा मटका नव्हता, जनतेचा कौल होता! हे २०२४ लाही जनतेने दाखवून दिले ; विरोधकांना पाटील गटाचा “हाबाडा”