निकीता आणि श्रेयश रोकडे यांचे घवघवीत यश ; शालेय राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत चिखलठाण येथील बहिण-भाऊ देशभरातून प्रथम
कंदर, दि. 6 (संदीप कांबळे)-
भोपाळ येथे संपन्न झालेल्या शालेय राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये करमाळा तालुक्यातील चिखलठाण या गावातील सर्वसामान्य कुटुंबातील निकिता अमोल रोकडे व श्रेयश अमोल रोकडे या दोघा भावंडांनी राष्ट्रीय स्पर्धेत आपला दबदबा कायम करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.
दि. 26 डिसेंबर 2023 ते 01 जानेवारी 2024 या दरम्यान भोपाळ येथे झालेल्या स्पर्धेत देशभरातून प्रथम आला आहे. रायफल शूटिंग खेळ हा अतिशय महागडा खेळ असून तो सर्वसामान्यांच्या अवक्या बाहेरचा आहे. परिस्थिती वरती मात करत या दोन्ही खेळाडूंचे नेवासा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटील विद्यालयातून शालेय स्तरावरून महाराष्ट्र संघात निवड झाली व भोपाळ येथील राष्ट्रीय स्पर्धेत ते सहभागी झाले. निकिता रोकडे हिने 19 वर्ष वयोगटात 10 मी ओपन साईट खेळ प्रकारात टीम सुवर्णपदक पटकावले तर श्रेयश रोकडे याने 17 वर्ष वयोगटात दहा मीटर ओपन साईट खेळ प्रकारात टीम सुवर्णपदक पटकावले.
या संपूर्ण स्पर्धेमध्ये भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमधून 1200 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या यशस्वी खेळाडूंचे त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक साहेबरावजी घाडगे-पाटील, अध्यक्षा सुमतीताई घाडगे-पाटील, उपाध्यक्षा स्नेहल घाडगे-पाटील, सचिव मनीष घाडगे-पाटील, प्राचार्य सोपानराव काळे, रायफल शुटिंग प्रशिक्षक छबुराव काळे, सुनिता काळे, अमोल रोकडे अभिनंदन केले आहे.
- रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरीच्या जाचक अटी शिथिल करा- भाजप जिल्हा सचिव लक्ष्मण केकान
- करमाळ्यात मराठा कुणबी प्रकरणासाठी अडवणूक ; ऐजंट आणि अधिकाऱ्यांमध्ये मिलीभगत- युवासेनेचा धरणे आंदोलनाचा इशारा
- भाळवणीच्या तृप्ती वाघमारे चे नीट (NEET) परीक्षेत घवघवीत यश
- कुंभेजच्या बागल विद्यालयात केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धांचे आयोजन
- २०१४ ला २५७ चा मटका नव्हता, जनतेचा कौल होता! हे २०२४ लाही जनतेने दाखवून दिले ; विरोधकांना पाटील गटाचा “हाबाडा”